परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

प्रा.गोविंद जाधव यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या हस्ते होणार अंबाजोगाई येथे सन्मान

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर व ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा'आदर्श पत्रकार पुरस्कार' प्रा गोविंद जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे पुरस्काराचे वितरण दिनांक २३ मार्च २०२५ रविवार रोजी प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉ. विठ्ठलराव लहाने व सुप्रसिद्ध अभिनेते सुनिल गोडबोले यांच्या हस्ते मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे होणार आहे.

राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर व ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना प्रतिवर्षी आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते 

त्यात आदर्श शिक्षक, समाजरक्षक, उद्योजक, पत्रकार आणि समाजसेवक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रतिभावंत व्यक्तींना गौरविण्यात येते यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्रा गोविंद राजाराम जाधव यांना जाहीर झाला असून त्यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सोपानराव ढगे , उपाध्यक्ष जी.डी. बनसोडे तसेच सचिव मिलिंद ढगे यांनी दिली आहे. आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल गोविंद जाधव यांचे माजी जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव सिरसाठ,सरपंच महेश आप्पा गारठे,उपसरपंच दत्ता काका जाधव,माजी सरपंच ज्ञानोबा बप्पा जाधव,माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख,डॉ डी वाय भारती, बाळासाहेब अरसुडे,प्रदीप कांबळे,गजानन मंदे,प्रकाश माले,सुरेश मिसाळ,मयूर जाधव,प्रा.मोदी,प्रा घुले,प्रा गंगने, प्रा सिरसाट,प्रा घुन्नर,प्रयोगशाळा सहाय्यक महादेव दौंड,विजय कांबळे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!