संत एकनाथ नामदेव महाराज व ह.भ.प. उत्तम महाराज धानोरकर यांचे लाभणार शुभाशिर्वाद

 परळीत गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिवसेवा हॉस्पिटलचे आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन

संत एकनाथ नामदेव महाराज व ह.भ.प. उत्तम महाराज धानोरकर यांचे लाभणार शुभाशिर्वाद


दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे राहणार उपस्थिती 

शिवसेवा हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे-डॉ. श्रेयस कराड 

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील शिवसेवा हॉस्पिटल, कराड कॉम्प्लेक्स,  स्टेशन रोड भागात गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भव्य दिव्य होत असलेल्या शिवसेवा (जनरल फिजीशीयन व सर्व रोग उपचार) हॉस्पिटलचा माजी मं त्री तथा परळीचे आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार असुन यावेळी संत एकनाथ नामदेव महाराज व ह.भ.प. उत्तम महाराज धानोरकर यांचे शुभाशिर्वाद लाभणार आहेत. दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे हे उपस्थिती राहणार आहेत. परळी शहरातील व पंचक्रोशितील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन -डॉ. श्रेयस कराड यांनी केले आहे. 

          बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री  प्रभू वैद्यनाथाचे पावन नगरी मध्ये परळी वैद्यनाथ शहरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शिवसेवा हॉस्पिटल सुरू होत आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन आ धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवार, 30 मार्च 2025  रोजी सायंकाळी 6.30 वा. होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष मुंडे (उपाध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय  महाराष्ट्र मुंबई) असतील. तसेच संत एकनाथ नामदेव महाराज व ह.भ.प. उत्तम महाराज धानोरकर यांचे शुभाशिर्वाद लाभणार आहेत. या कार्यक्रमाला श्री नाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, एमबीबीएस एमएस देगलूर डॉ. विनायक मुंडे, आनंद हॉस्पिटलचे डॉ. राजाराम मुंडे, के. एम हॉस्पिटल मुंबई डॉ. प्रवीण बांगर, कराड हॉस्पिटल तथा परळी मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. शालिनी कराड, परळी मेडिकल असोसिएशन सचिव डॉ. मनोज मुंडे, लाईफ लाईन मल्टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर संचालक डॉ. सचिन बांगर, स्टार लाईन मल्टी हॉस्पिटल पुणे डॉ. रविंद्र सेलमोहकर, स्टार लाईन मल्टी हॉस्पिटल पुणे डॉ. अर्चना सेलमोहकर, वनरूपी क्लनिक मुंबई डॉ. राहुल घुले, समर्थ हॉस्पिटल डॉ. सतीश गुट्टे, सी. डब्लू, आर. पी. एम. पुणे अश्विन सारुक, मुंडे डेंटल हॉस्पिटल डॉ. दीपक मुंडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अभिजीत बांगर, नोटरी भारत सरकार ऍड. सुभाष गित्ते, वैद्यकिय अधिकारी औढ नागनाथ डॉ. प्रशांत घुगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिवसेवा हॉस्पिटल, कराड कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, परळी वैजनाथ येथे सुरू होत असून, येथे नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुनिल केशवराव कराड, प्रशांत केशवराव कराड व डॉ. श्रेयस सुलेखा-सुनिल कराड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार