शाहु, फुले, आंबेडकर, आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा



शाहू फुले आंबेडकर १६५ अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना VJNT शाळासहिंता लागू करून नियमित वेतनश्रेणी प्रमाणे १०० टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवणे बाबत. 21 मार्च शुक्रवार रोजी शाहू फुले आंबेडकर,अनु.जाती आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेत्तर संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री यांना जिल्हाधिकारी सोलापूर समाज कल्याण सोलापूर यांच्यामार्फत संघटनेकडून निवेदन देण्यात आले.

      शाहु, फुले, आंबेडकर १६५ आश्रमशाळा योजनेत असलेल्या बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे सरांनी १८ वर्षापासून वेतन नसल्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. नागरगोजे सरांना श्रद्धांजली. मृत शिक्षकांच्या कुटुंबाला रू.१०,००,०००/-(दहा लाख रूपये) ची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.शासनाकडून या शाळांना न्याय मिळावा अशी भावना ययेथे व्यक्त करत आहे गेल्या अनेक वर्षापासून शाहू फुले आंबेडकर १६५ निवासी आश्रमशाळा गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात.अनेक वर्षांपासून या शाळांना न्याय मिळत नाही मात्र १०० टक्के प्रमाणे वेतनश्रेणी नुसार अनुदान मिळावे VJNT च्या आश्रमशाळा संहिता लागू करून कर्मचाऱ्याना सेवा सातत्य मिळावे,अशी मागणी कर्मचारी संघटनेची आहे.महाराष्टातील १६५ आश्रम शाळेच्या आमच्या सखोल तपासण्या झाल्या यातील अनेक शाळा पात्र होऊन देखील, शासनाकडून दखल घेतली जात नाही.

      तसेच शाहू, फुले आंबेडकर,आश्रमशाळा कर्मचारी संघटनेतर्फे५८ दिवस मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण होऊन देखील न्याय मिळत नाही. फार मोठी शोकांतिका आहे, जर अनुदान मिळाले नाही, तर अशा किती आत्महत्या होतील? सांगता येत नाही, अनुदान न मिळाल्यामुळे शिक्षकांच्या पदरी निराशाच आली आहे. एका बाजुला अनुदान नाही दुसरीकडे कुटुंबांचा खर्च भागविणे अवघड चालले आहे.

त्यामुळे आश्रमशाळेतील कर्मचारी चिंताग्रस्त,निराशमय जीवन जगत आहे याच निराशेतून धनंजय नागरगोजे या शिक्षकांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचललेले आहे सरकारने जर आश्रमशाळांना अनुदान दिले असते तर नागरगोजे सरांचा जीव वाचला असता.सरकारला अजून किती कर्मचाऱ्यांचा बळी घ्यायचा आहे असा संतप्त सवाल शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र राज्य सदस्य श्री.गणेश साखरे सर ,सोलापूर जिल्हा संघटना अध्यक्ष श्री.अनिल गेजगे सर, उपाध्यक्ष दादासो बेहरे सर, श्री नामदेव कुंभार सर,सभासद श्री.प्रभू शेळके सर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार