माजी सैनिकाच्या विविध प्रश्नाबाबत महत्वपूर्ण बैठक पडली पार
गेवराई :-(प्रतिनिधी) आज दिनांक 10 /4/25 गुरुवार रोजी माजी सैनिक यांच्या विविध प्रश्नाबाबत नगरपरिषद गेवराई वाचनालयात जवळील ज्येष्ठ नागरिक कार्यालयात बैठक संपन्न झाली.
यामध्ये गेवराई येथील माजी सैनिकाचे विविध प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्याला गती देण्यासाठी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीसाठी सतीश कोटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक व बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष तथा श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई अध्यक्ष अनिल बोर्डे यांना व गेवराई ग्राहक पंचायतचे विश्वास चपळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत सर्वप्रथम किसन भारती साहेब यांच्या पत्नी व छत्रभुज सानप यांच्या सुनबाई यांचे अकस्मित निधन झाल्यामुळे दोन मिनिटाचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर माजी सैनिकाच्या विविध प्रलंबित आणि अडीअडचणी बाबत सतीशजी कोटकर साहेब एपीआय गेवराई यांनी माजी सैनिकाच्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर उपाय योजना करण्याचे मान्य केले व माजी सैनिकाच्या अडीअडचणी जाणून घेऊन योग्य ते मार्गदर्शन केले. समाजाने माजी सैनिकांसाठी आत्मीयता बाळगणे आवश्यक आहे. व त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे याची जाणीव होणे आवश्यक आहे. या बैठकीस संबंधितांनी योग्य मार्गदर्शन केले.
बैठकीत उपस्थित राहिल्याबद्दल श्री कोटकर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्वाच्यावतीने स्वागत करण्यात आले.
त्यानंतर माजी सैनिकाचे अध्यक्ष बळीराम डोंगरे यांनी सर्व माजी सैनिकाच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यात येईल व उपस्थित राहिल्या बद्दल सर्व माजी सैनिकाचे व उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले. अशा रीतीने बैठक संपन्न झाली . या बैठकीत माजी सैनिक अध्यक्ष बळीराम डोंगरे, भुजंगराव कापरे सचिव, भालचं किसन भारती भालचंद्र कोंढरे, शिवाजी संत दिलीप काकडे एकनाथ शिंदे मोमीन साहेब भारती साहेब सानप रहीम शेख साहेब विजयकुमार जगदाळे नागरे साहेब आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा