वाळू तस्करी: सिरसाळा पोलिसांनी गोदावरी पात्रात केली कारवाई; तीन लाखाचे वाहन व 12 हजाराची वाळू केली जप्त
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
अवैधरीत्या गोदावरी पात्रातून वाळू उपसा करून वाळूची तस्करी करणाऱ्या एका वाहनावर सिरसाळा पोलिसांनी कारवाई केली आहे.दि. 25 रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असुन या कारवाईत तीन लाखाचे वाहन व बारा हजार रुपयांची वाळू पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, यातील आरोपी बालाजी सुदाम मोठे रा. केकरजवळा ता. मानवत जि. परभणी हे मौजे तेलसमुख ता. परळी जि. बीड येथील नदीपात्रात टाटा १६१३ टर्बो कंपनीचा टिप्पर बेकायदेशिर रित्या, विनापरवाना अवैध वाळु भरुन त्याची चोरटी विक्री करण्यासाठी चोरुन घेवुन जात असताना पोलीसांनी कारवाई केली. पोलीसांना पाहुन आरोपी त्याच्या ताब्यातील टिप्पर जागीच सोडुन पळुन गेला. या कारवाईत पोलीसांनी ३,००,००० रु. किंमतीचे एक टाटा १६१३ टर्बो कंपनीचा टिप्पर व टिप्परचे ट्रॉलीमध्ये अंदाजे ०२ ब्रास वाळु भरलेली प्रति ब्रास किं.६०००/- रुपये असा एकुण १२,००० रु. चा वाळू जप्त केली आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सिरसाळा गोरकनाथ बाबासाहेब दहीफळे यांनी फिर्याद दाखल केली असुन आरोपीविरुद्ध गुरन- ११५/२०२५ कलम-३०३ (२) भान्यास. २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा