भाजप नेते किरीट सोमैय्यांच्या ठिय्यानंतर परळीचे महसूल प्रशासन खडबडून जागे: 14 जणांविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

       परळी येथे जन्मदाखले देण्यात प्रचंड बोगसगिरी झाल्याचा आरोप करत परळीच्या तहसीलदार, नायब तहसीलदारांसह संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल करा. या मागणीसाठी तीन तास परळी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसलेल्या भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या पाठपुराव्यानंतर आता परळीतील महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असुन महसूल अधिकाऱ्यांनी चौदा जणांविरुद्ध चुकीचे दस्तऐवज सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

        याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, जन्म व मत्यु प्रमाणपत्र मिळणेसाठी परळी येथे रहिवासीचा / मृत्यु बाबतचा कोणताही ठोस पुरावा सादर न करता परळी व सिरसाळा बाहेरील खोटे कागदपत्रे तहसील कार्यालय परळी वैजनाथ येथे सादर करुन शासनाची फसवणूक केली. परळीचे जन्म व परळी येथे मृत्यु झाले बाबत प्रमाणपत्र हस्तगत करुन शासनाची फसवणूक केली म्हणुन महसूल प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.तहसील कार्यालयातील सहाय्यक महसुल अधिकारी  व्यंकट जयराम सुर्यवाड यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली असुन या फिर्यादीवरून 1) श्री. सुमित विजयकुमार झंवर रा. परळी 2) वैखेमुंनबी इसामशहा सय्यद, रा. परळी 3) सुनिल मारोती6) शेख गफ्फार सत्तार रा. परळी 7) शाहीनबेगम युसुफ बक- यावाले रा. परळी 8) राजीव प्रकाश फड रा. परळी 9)कांबळे रा. सिरसाळा 4. शेख गुलाम हबीब गुलाम मुस्तफा रा. सिरसाळा 5) महीबीशबेगम सिध्दीक आली शेख रा. परळी फेरोजखा इसाकखा पठाण रा. सिरसाळा 10) शेख अजहर शेख वहीदोद्दीन रा. सिरसाळा 11) नितीन राजाभाऊ पौळ रा. सिरसाळा 12) अलीम अब्दुल सय्यद रा. परळी 13) शेख फारुख खमरोद्दीन रा. परळी 14) मो. अबदुस समंदखान खालेद पि. मो. अब्दुल रहेमान खान रा. सिरसाळा या चौदा नागरिकांवर गुरनं. 82/2025 कलम 420, 468, 471 भादवी सहकलम 24 The Registration of Births and Deaths Act 1969 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ हे करीत आहेत.


परळीचे तहसीलदार तक्रारीसाठी पुढे आल्याचा दिला होता किरिट सोमैय्या यांनी संदर्भ

       दरम्यान, किरीट सोमय्या दिनांक 15 रोजी परळी वैजनाथ येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी मी हे प्रकरण उचलल्यानंतर व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर परळीचे तहसीलदार तक्रार देण्यास पुढे आल्याचे म्हटले होते. मात्र त्यांनी तक्रार दिली तरीही महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हे दोषी नाहीत असे होत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. तहसीलदार, नायब तहसीलदार व संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार