परळी शहरातील दोन्ही पोलीस ठाण्यांचा गहाळ मोबाईल तपासकामांचा धडाका !
संभाजीनगर पोलीसांनंतर शहर पोलीसांनीही गहाळ 17 मोबाईल शोधून तक्रारदारांना केले परत
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्याची उल्लेखनीय कामगिरी परळीतील दोनही पोलीस ठाण्यांनी केली आहे. नागरिकांकडून मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर शहर पोलीस ठाण्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. या तपासादरम्यान १७ मोबाईल परत मिळवून त्यांच्या मूळ मालकांना आज (दि.५) सुपूर्द करण्यात आले.कालच संभाजीनगर पोलिसांनी १३ गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत केलेले आहेत.
पोलीस ठाणे परळी शहर यथे नागरीकांचे मोबाईल गहाळ झाले बाबतच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने या तक्रारींच्या अनुषंगाने गहाळ मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेण्यासाठी परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी पोलीस अंमलदार कैलास कोलमवाड यांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे पोलीस अंमलदार कैलास कोलमवाड यांनी तांत्रिक विश्लेषनाव्दारे शोध घेवुन वेगवेगळया कंपनीचे एकुण 17 मोबाईल एकुण 309,000 रुपये किंमतीचे गहाळ मोबाईल शोध घेवुन हे मोबाईल मुळ मालक तक्रारदार यांना परत करण्यात आले.ही कामगिरी पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके अंबाजोगाई, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परळी शहरचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण, पोउपनि शिंगणे , पोलीस अंमलदार कैलास कोलमवाड, रामकिशन रेडेवाड पंडीत पांचाळ तसेच टेक्निकल अॅनालिसेस सेल बीड येथील पोलीस अंमलदार विक्की सुरवसे यांनी केली आहे.
या तक्रारदारांचे मोबाईल केले परत...
1) अजाम अल्ली हसन अल्ली रा- शाहा बाजार जि. छत्रपती संभाजी नगर
2) हनुमान व्यंकटराव सातपुते रा. स्वाभीमान नगर परळी वै. जि.बीड
3) गाविंद सौदागर फड रा. सौंदाना ता. अंबाजोगाई जि. बीड
4) रमेश बालाजी रोडे रा. सोमेश्वर नगर परळी वै. जि.बीड
5) दिपक माहादेव पातरकर रा. वडसावित्रीनगर परळी वै. जि.बीड
6) शिवराज देवराव रोडगे रा स्वातीनगर परळी वै. जि.बीड
7) श्रीधर नागनाथराव बोकन रा. माणिकनगर परळी वै.जि.बीड
8) आशोक सुधामराव तरकसे रा. भिमनगर परळी वे. जि.बीड
9) निखील सुनिल धनवडे रा. किन्ही ता हातकनगुले जि. कोल्हापुर
10) शेख सरफराज शेरु रा. आझाद नगर परळी वै. जि.बीड
11) संतोष रामभाऊ आलापुरे रा. माणिकनगर परळी वै. जि.बीड
12) अविनाश विश्वनाथ गुट्टे रा स्नेहनगर परळी वै. जि.बीड
13) शेख फैजान मजल शेख रा. पेठ मोहल्ला परळी वै. जि.बीड
14) अश्रोवा गुरुलिंगअप्पा पिंपळे रा. पंचवटी नगर परळी वै. जि.बीड
15) अनंत मुंजाजी धाटे रा. भिमवाडी परळी वै. जि.बीड
16) ओमकेस तुकाराम गुट्टे रा. मांडवा ता. परळी वै.जि. बीड
17) सार्थक अरुन पुरी रा. गुरुकृपा नगर परळी वै. जि. बीड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा