इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 जयवंती नदी पात्रातील अतिक्रमणे काढा: मागणीसाठी अभिजीत लोमटे यांचे २९एप्रील रोजी उपोषण 


अंबाजोगाई --: (वसुदेव शिंदे)

    अंबाजोगाई शहरातील जयवंती नदी पात्रातील अतिक्रमणे काढावे या मागणीसाठी 29 एप्रिल पासून उपोषणास बसत आहेत.

   अंबाजोगाई शहर हद्दीतील जयवंती नदी ही ऐतिहासिक व पौराणिक असून  पुरातन  काळापासून अंबाजोगाई शहरवासी यांचे धार्मिक कार्यक्रम या नदीकाठावर पूर्वपारपासून होत होते अंबाजोगाई शहराचे नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या जयवंती नदी ही शहरातील काही समाजकंटक यांनी पूर्णपणे गिळंकृत  करून कागदपत्राची हेराफेरी करत नदीस नाला घोषित केला आहे नदी पात्रात अनेक अनधिकृत बांधकाम करून धन दांडग्यांनी  संगमत करून स्वतः देखील अनधिकृत कब्जा करून नदी गिळणकृत केली आहे वास्तविक पाहता महसूल व शासनाकडे संपूर्ण रेकॉर्ड असताना देखील राजकीय दबावामुळे सदरच्या अतिक्रमाला विरोध केला जात नाही या उलट स्थानिक महसुली अधिकारी शांत बसून एक प्रकारे अतिक्रमाला खतपाणी देत आहेत तहसीलदार अंबाजोगाई यांनी सदरची अतिक्रमणे त्वरित दूर करावीत.


 शिवाय राजकीय पाठबळाच्या जोरावर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी नियमबाह्य पणे नदी पात्रात बांधकाम केलेल्या नियमबाह्य कामाची प्रशासनाने सदरच्या कामाची चौकशी करावी तसेच जयवंती नदीचे दस्तावेज अनधिकृतपणे फेरबदल करत जयवंती नदी चा नाला करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात तसेच जा. क्र 880 उपविभागीय अधिकारी यांनी नपचे सहाय्यक आयुक्त यांच्या पत्राचा संदर्भ देत तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निर्देश दिले होते अशी माहिती तत्कालीन जयवंती नदी बचाव समितीच्या वतीने मीडियाला दिली होती त्या अनुषंगाने त्या पत्रावर कुठलीच कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी या मागणीसाठी डिजिटल मीडिया परिषदेचे  अध्यक्ष अभिजीत लोमटे मंगळवार दिनांक 29 एप्रिल पासून उपोषणास बसत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!