पिंपळनेर येथील दौरा रद्द :नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे राहणार नाहीत उपस्थित
श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पिंपळनेर जिल्हा बीड येथे सुरू असलेल्या 91 व्या नारळी सप्ताह सांगता सोहळ्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार होते मात्र आता धनंजय मुंडे यांनी आपण हा दौरा रद्द करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे आता उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विमानाच्या काही तांत्रिक कारणांमुळे या कार्यक्रमाला पोहोचणे शक्य नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे धनंजय मुंडे यांची पोस्ट?
मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे. अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे.
श्री क्षेत्र भगवानगड, आदरणीय महंत न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेर वासियांची हृदहपूर्वक क्षमा मागतो.
-धनंजय मुंडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा