सुवर्णपदक विजेते सुभाष नानेकर सरांनी अनेक कुस्तीपटू सह खेळाडू घडवले-महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान

मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून शुभेच्छा 


परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)

   सुभाष नानेकर सरांनी जीव ओतून कुस्तीसाठी योगदान दिले, आजच्या काळात अशा शिक्षकांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान यांनी केले. ते सेवानिवृत्त आदर्श शिक्षक, कुस्ती सुवर्णपदक विजेते सुभाष नानेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते.

               शहरातील सरस्वती विद्यालयातील आदर्श शिक्षक, कुस्ती सुवर्णपदक विजेते सुभाष नानेकर सर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, जागृती बॅकेचे अध्यक्ष गंगाधर शेळके, दत्ताप्पा ईटके, डाॅ.सुरेशअप्पा चौधरी, लोकमान्य पतसंस्थेचे अध्यक्ष पी.एस घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, सुरेश टाक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर सुभाष नानेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवाजी केकान यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. तर दत्ताप्पा ईटके यांच्या वतीने सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शिवाजी केकान म्हणाले की, सुभाष नानेकर हे उत्कृष्ट खेळाडू होते. त्यांनी कुस्तीमध्ये विविध स्पर्धेत यश मिळवत राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले. यातूनच ते सरस्वती विद्यालयात खेळाचे शिक्षक म्हणून नौकरी करु लागले. शिक्षकीपेशामध्ये फक्त नौकरी केली नाही तर कबड्डी , खोखो, कुस्ती मध्ये हजारो खेळाडू घडवले.अशा शिक्षकांची आजच्या काळात समाजाला गरज आहे. यावेळी सुभाष नानेकर यांच्या विद्यार्थिनी पशू, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्हिडिओ मेसेज घ्या माध्यमातून श्री नानेकर सरांना शुभेच्छा दिल्या. दत्ताप्पा ईटके, डॉ सुरेश चौधरी, गंगाधर शेळके,  वैजनाथ सोळंके आदिंनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास सुभाष नानेकर सरांनी घडवलेले अनेक खेळाचे, क्रिडा शिक्षक, मीनाक्षी नानेकर, ज्ञानेश्वर नानेकर, सुप्रिया जगताप, दयानंद नानेकर व समस्त नानेकर परिवार उपस्थित होता.

---------------------------------------------

सुभाष नानेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रंथतूला

      सुभाष नानेकर आदर्श शिक्षक असल्याने परिवारातील सदस्यांनी सरांची ग्रंथ तुला केली. त्यांच्या वजना एवढे देशाची राज्यघटना, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण, महात्मा फुले यांचे चरित्र, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा अशा अनेक पुस्तकांची तुला करण्यात आली. तसेच ग्रंथतुले बरोबरच गुळतुलाही करण्यात आली.

--------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार