युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 रेल्वे पटरी जवळील पिंपळाच्या झाडाखालील मारुतीला दिवा लावायला गेलेल्या युवकास मारहाण ;जखमी केले, दातही पडला

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
      परळीतील रेल्वेमार्गाच्या बाजूस असलेल्या काकरनगर जवळील मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळून सिद्धेश्वरनगरमधिल फिर्यादी युवक व त्याचे साथीदार रेल्वे पटरी जवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाखालील मारुतीला दिवा लावायला जाताना हात उगारला व परत येताना मात्र त्याच्यावर भ्याड हल्ला करून चार ते पाच जणांनी मारहाण केली. दगड फेकून मारला  यात हा युवक जखमी झाला. या महाराणीत त्याचा दातही पडला असुन नावं माहित नसलेल्या अनोळखी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             याबाबत पोलीस सरांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,यातील फिर्यादी समर्थ बाळासाहेब कदम वय 16 वर्षे  रा. सिद्धेश्वरनगर व त्याचे साथीदार काकानगर येथुन क्रिकेट खेळुन रेल्वे पटरीजवळील पिंपळाचे झाडाखालील मारुतीला दिवा लावण्यासाठी जात असताना आरोपीतांनी हात उगारला. तेथून परत येत असताना यातील अनोळखी पाच इसमांनी काही एक कारण नसताना त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान फिर्यादीला यातील कोणीतरी एकाने दगड फेकुन मारला. तो फिर्यादिचे तोंडाचे उजव्या बाजुला लागुन एक दात पडला व तोंडाला दुखापत झाली. तसेच शिवीगाळ केली. भांडण करणारे त्यांचे वागण्यावरुन व बोलण्यावरुन मुस्लिम समाजाचे असावेत असे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी परळीतील पो.स्टे. संभाजी नगर येथे गु.र.न. 77/2025 कलम 118 (2), 189 (2) (4), 190, 191(2) (3), 352 भा.न्या. संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सफौ चव्हाण हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या