गाढे पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवकथेची उत्साहात सुरुवात

परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)

          तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे गेल्या १५२ वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता.१९) पासून शुक्रवार (ता.२५) पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

               दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्या निमित्त शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेचा प्रारंभ झाला. या हरिनाम सप्ताहात शनिवारी सोपान महाराज नानवटे, रविवारी अॅड पांडुरंग महाराज लोमटे धाराशीव, सोमवारी माऊली महाराज खडकवाडीकर, मंगळवारी अविनाश महाराज घुले टाकळीकर, बुधवारी प्रभाकर महाराज झोलकर, गुरुवारी महादेव महाराज चाकरवाडीकर,वासुदेवानंद महाराज टाकळीकर यांचे काल्याचे किर्तन शुक्रवारी १२ ते २ होणार आहे. रोज पहाटे काकडा आरती,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी अंकिता माने यांची १ ते ५ शिव कथा, सायंकाळी ६ ते ७ धुप आरती होणार आहे. तर मुख्य पालखी सोहळा शुक्रवारी रात्री १२ वाजता श्री.पापदंडेश्वर मंदिरातून निघणार असून रात्री पालखी मार्गावर भारुडे, सकाळी गवळणी व शनिवारी दुपारी महाआरती नंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या पालखी सोहळ्यास व अखंड हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे

---------------------------------------------------

अंकिता माने यांची शिवकथा

          यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहात दुपारी १ ते ५ श्री पापदंडेश्वर मंदिरात शिवकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेस शनिवारी दुपारी सुरुवात झाली. यावेळी विकास जालिंदर राडकर यांच्या हस्ते सपत्नीक आरती पुजा करुन कथेस प्रारंभ करण्यात आला. महिला व भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार