सोलापूर : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ – प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी केली आत्महत्या
सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना आज (दि. १८ एप्रिल) रोजी घडल्याची माहिती असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे.
शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना त्यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात घडली असल्याची माहिती समोर येत आहे. सदर बाजार पोलिसातील सूत्रांनी याला दुजारा दिला आहे.डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. डॉक्टर वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.
अत्यंत वाईट बातमी आहे
उत्तर द्याहटवान्यूरो सर्जन वळसंगकर कमी बील आकारत रुग्ण सेवा करत होते
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
आणी ज्या ही कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि ज्या लोकांमुळे आत्महत्या केली ते कधीच समाधानी राहणार नाहीत
Correct
उत्तर द्याहटवा