वैद्यनाथ मंदिर येथे अजुन तीन दिवस धार्मिक पर्वणी.....
परळीत श्रीगुरुचरित्र सारामृत पारायणाला उत्साहात प्रारंभ: मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग
'गुरुचरित्र' हे चरित्र आणि धर्माधिष्ठित चारित्र्य घडवते -प.पू. मकरंद महाराज दत्तधाम परभणी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ व गुरुतत्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगुरुचरित्र सारामृत पारायण व श्रीगुरुचरित्र कथामृत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यास आज (दि.७) रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या पारायणास मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.गुरुचरित्र हे चरित्र आणि धर्माधिष्ठित चारित्र्य घडवते असे प्रतिपादन प.पू. मकरंद महाराज दत्तधाम परभणी यांनी केले.
परळी वैजनाथ जवळील डोंगरतुकाई हे जाज्वल्य ठिकाण आहे.या मंदिरात गुहेत साधारणत: चार ते पाच पायऱ्या उतरून गेल्यावर खाली तळघर लागते. तळघर साधारणत: पाच फूट लांबी रुंदीचे आहे. याच गुहेत श्री.दत्तात्रय अवतार प.पू.श्री. श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (गाणगापूर) हे याच गुहेत एक वर्ष वास्तव्यास राहिले होते. या अनुषंगानेच परळी वैजनाथ पवित्र नगरीमध्ये श्रीगुरुचरित्र सारामृत पारायण व श्रीगुरुचरित्र कथामृत सोहळा सोमवार दि.०७-०४- २०२५ ते गुरुवार दि.१०-०४-२०२५ आयोजित करण्यात आला आहे. ९० वर्षापूर्वी संत कवी परमपूज्य दासगणू महाराजांनी श्री गुरुचरित्र या सिद्धग्रंथावर आधारित "श्री गुरुचरित्र सारामृत" हा सिद्धग्रंथ लिहला आहे. सांप्रत काळाचा विचार करून या धकाधकीच्या काळात श्रीगुरुचरित्राची नितांत गरज असल्याकारणाने सर्व कडक नियमांना शिथिलता देऊन सर्व समाजातील स्त्री- पुरुषांना वाचता येण्याकरता या ग्रंथाची निर्मिती करून घेतली. श्री वैजनाथ ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनै पारायणात सहभाग घेतला आहे.
दर्शन मंडप, वैद्यनाथ मंदिर, श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे आज सोमवार दि.०७-०४- २०२५ रोजी सकाळी रुद्र अभिषेक करण्यात आला.त्यानंतर श्री गुरुचरित्र सारामृत पारायणास प्रारंभ झाला..प.पू. मकरंद महाराज (पिठाधिपती, श्री क्षेत्र दत्तधाम (कारेगाव), परभणी श्री गुरुचरित्र कथामृत विवेचन केले.
• गुरुचरित्र ग्रंथ हा चरित्र आणि धर्माधिष्ठित चारित्र्य घडवते -प.पू. मकरंद महाराज दत्तधाम परभणी
यावेळी बोलताना परमपूज्य मकरंद महाराज यांनी सांगितले की, गुरुकृपेशिवाय जगात कोणतीही गोष्ट सकारात्मक नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा जीवनाला दिशादर्शक व मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. या ग्रंथातील साधने आणि सिद्धांताचा अवलंब केल्यास कल्याणकारी जीवन दूर नाही. गुरुचरित्र सारामृत ग्रंथाच्या अनुक्रमणिके विषयी त्यांनी आज कथामृतामध्ये सविस्तर माहिती दिली. अतिशय रसाळ वाणीतून परमपूज्य मकरंद महाराज यांनी केलेले विवेचन ऐकताना भाविक तल्लीन झाले होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा