युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

१२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण !


केज :- केज शहरातून रात्री ११:०० वा. ६ वीच्या वर्गात शिकत असलेल्या १२ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.

       केज येथे राहात असलेली व सहावीच्या वर्गात शिकत असलेली १२ वर्ष वयाची मुलगी, तिची आई व लहान भाऊ हे दि. २ एप्रिल रोजी जेवण करून झोपी गेले. त्या नंतर रात्री ११:३० च्या सुमारास ते भाड्याने राहात असलेल्या घर मालकीनिने त्या मुलीच्या आईला झोपेतून उठविले आणि सांगितले की, तुमची मुलगी ही शेजारच्या एका महिलेच्या मोबाईल वरून कोणाला तरी फोन लावत होती. त्या नंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. अल्पवयीन मुलीने शेजारच्या महिलेच्या मोबाईलवरून ज्या अज्ञात व्यक्तीला फोन लावला; त्याच अज्ञात व्यक्तीने तिचे अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे अशी त्यांना शंका आहे.

या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून अज्ञात अपहरणकर्त्या विरुद्ध केज ओलीस ठाण्यात गु. र. नं. १३३/२०२५ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या