भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांनी दाखवले परळीत काळे झेंडे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    भाजपा नेते किरीट सोमय्या हे परळी शहरात आले होते. तब्बल तीन तास त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बोगसगिरी करून जन्म दाखला देणाऱ्या संबंधित सर्वावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. परळीतून ते परत जात असताना अचानकपणाने मुस्लिम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. त्यांनी थेट सोमैय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.

      भाजपा नेते किरीट सोमैय्या हे जन्म दाखले देताना झालेल्या बोगसगिरीच्या विरुद्ध संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन पुराव्यासह पोलीस ठाण्यात आले होते. परळीतील बोगस जन्मदाखले रद्द करून असे दाखले जारी करणाऱ्या तहसीलदार  नायब तहसीलदार व सर्व संबंधितावर गुन्हे दाखल करा अशी त्यांनी मागणी केली. पोलीस ठाण्यातून ते परत जात असताना परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक व एक मिनार चौकात घोषणाबाजी करत काही मुस्लिम नागरिकांनी हातात काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.किरीट सोमैय्या यांचा ताफा या रस्त्यावरून जात असताना किरीट सोमय्या जाणीवपूर्वक बांगलादेशी नागरिकांच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप करत थेट सोमैय्या यांच्या निषेधाच्या घोषणा या काळे झेंडे दाखवणाऱ्या जमावाने दिल्या. दरम्यान पोलीस प्रशासनाने ही परिस्थिती हाताळत त्यांचा ताफा सहीसलामत या मार्गावरुन काढून दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !