जनावरांना बदडून काढावं अशी निर्दयी व बेदम मारहाण!

खळबळजनक: सरपंचासह १० जणांनी महिला वकिलाला केली निर्दयी व बेदम मारहाण !

निर्दयी व  क्रुरपणाने केलेल्या मारहाणीचे फोटो व्हायरल

 अंबाजोगाई, प्रतिनिधी....

    माणसांना नेमकं काय झालं आहे ? माणूस निर्दयी बनलाय का? एखाद्या महिलेच्या बाबतीतसुद्धा जनावरांना बदडून काढावं असं निर्दयी व बेदम मारहाणीचं दुर्दैवी खळबळजनक प्रकरण आता बीड जिल्ह्यातच समोर आलं आहे. वकील असलेल्या महिलेवर राग काढण्यासाठी १० जणांनी मिळून तिला प्रचंड मारहाण केली आणि विशेष म्हणजे यात गावचा लोकप्रतिनिधी असणाऱ्यां सरपंचानेही सहभागी व्हावे ही लाजिरवाणी आणि चिड आणणारी घटना घडली आहे.या मारहाणीचे  फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असुन हे पाहून संताप व्यक्त होत आहे.

        ध्वनी प्रदूषणा मूळे आवाज कमी करावा या मागणीची तक्रार केल्याच्या कारणावरुन संतापलेल्या गावच्या सरपंचासह 10 साथीदारानी आपल्याच गावातील महिला वकिलास बेदम मारहाण केल्याची घटना आंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे घडली आहे.याप्रकरणी आता आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या व अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील राहिवासी ॲड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या महिला वकीलाने सनगाव गावात ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत  तक्रारी दिल्या होत्या. याचा राग मनात धरून याच गावचे सरपंच अंजान आणि त्याच्या 10 कार्यकर्त्यानी ज्ञानेश्वरी ही तिचे अंबराईचे शेतात कै-या आणण्यासाठी जात असतांना शेतातील बांधाचे जवळ गेली असता यातील आरोपी क्र. एक ते सहा यांनी त्यांचे हातात काळा रबरी पाईप घेवुन व आरोपी क्र. सात ते नऊ हे हातात लाकडी काठ्या घेवुन तिच्या जवळ आले व तु या पुर्वी गावातील पिठाच्या गिरण्या व मंदिरावरिल भोंग्याच्या तक्रारी का दिल्यास व तुझे आईची कोर्टात सुरु असलेली 307 ची केस का काढून घेत नाहीस व तु यापुढे आमचे विरुध्द तक्रार देशील का?असे म्हणुन त्यांचे हातातील काठ्या व रबरी पाईपने फिर्यादीचे पाठीवर, मानेवर कमरेवर दोन्ही पायाचे पाठीमागील पायावर ,पार्श्वभागावर मारहान करुन गंभीर दुखापत केली. आरोपी क्र. एक व तीन याने वाईट हेतुने तिच्या हाताला धरुन अंगास झोंबाझोंबी करुन विनयभंग केला. तर आरोपी क्र. दहा याने तिला खलास करुन टाका असे म्हणुन अर्वाच्य भाषेत शिविगाळे केली अशा आशयाच्या फिर्यादीवरुन या प्रकरणी युसूफ वडगाव पोलिसात अनंत रघुनाथ अंजान, २) सुधाकर रघुनाथ अंजान, ३) राजकुमार ज्ञानोबा मुंडे, ४) कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ५) ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, 6) नवनाथ ज्ञानोबा जाधव ७) मृत्युजय पांडुरंग अंजान 8) अंकुश बाबुराव अंजान 9) सुधीर राजाभाऊ मुंडे, 10) नवनाथ दगडु मोरे सर्व रा. सनगाव ता. अंबाजोगाई जि. बीड या 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ  सय्यद हे करत आहेत.

    दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी या प्रकरणी समाज माध्यमावर पोस्ट केल्या नंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.या क्रुर व निर्दयीपणाने महिलेला  झालेल्या बेदम मारहाणीचे व्हायरल झालेले फोटो बघून संताप व चीड व्यक्त होत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार