परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

नागरी समस्यांकडे जरा गांभीर्याने बघा!

अंबेवेस रस्त्यावरील फुटलेल्या धोकादायक ढाप्याची त्वरित दुरुस्ती करावी - अश्विन मोगरकर

परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....

प्रभाग क्रमांक 5 मधील अंबेवेस ते भाजी मंडई रोडवरील ढाप्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने  ढापा फुटून त्यातील गज उघडे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. नगरपरिषदेने त्वरित अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या सदरील ढाप्याची दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

परळी शहरातील अनेक रस्त्यांची कामे चालू आहेत. या रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे मात्र अनेक कामे अर्धवट तर काही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने  प्रशासनाचा गलथान कारभार उघडा पडत आहे. याचा नमुना म्हणजे प्रभाग क्रमांक 5 मधील अंबेवेस ते भाजी मार्केट रोडवरील ढापा मधोमध फुटल्याने त्यातील लोखंडी गज उघडे पडले आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याने गावभागातून मोंढ्याकडे जाण्याचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरून होत असते. अनेक शाळेत जाणारे विद्यार्थी हाच रस्ता वापरतात. भाजीमंडई असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल नेण्यासाठी हाच रस्ता असल्याने वाहतूक करणाऱ्या वाहनांना या फुटलेल्या ढाप्यामुळे अडचण होत आहे.

दोन दिवसांपूर्वीच शहरातील स्नेह नगर भागात फुटलेल्या ढाप्यात गाय पडून गंभीर जखमी झाली होती. शहरातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट सोडलेली आहेत. दोन रस्त्यातील जोड न पूर्ण केल्याने अनेक वाहनचालकांना अचानकपणे ब्रेकचा वापर केल्याने अपघाताला सामोरे जावे लागले आहे. गणेशपार रोडवरील अनेक ठिकाणी जोड रस्ते तसेच सोडून दिल्याने खड्डे तयार झाले आहेत. या कामावर नगरपरिषद अभियंत्याचे कुठलेही लक्ष नसल्याने कामे अर्धवट सोडली जात आहेत. परळी नगरपरिषद प्रशासनाचा आंधळा कारभाराने नागरिकांच्या जीवाशी आला आहे. नगरपरिषद प्रशासन फक्त कार्यालयात बसूनच कारभार हाकत असल्याचा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे. 

गावभागातील जोडरस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत व अंबेवेस येथील फुटलेला ढापा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!