इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 बीड जिल्हा बॅंकेचे पालकत्व पुणे जिल्हा बॅंकेने स्विकारावे !

राजकिशोर मोदी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे  निवेदन

 अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पालकत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वीकारावे अशा प्रकारची मागणी अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा  अंबाजोगाई नगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी  एका निवेदनाद्वारे अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत कापूस पणन महासंघाचे संचालक ऍड विष्णुपंत सोळंके हे होते.  

            मागील काही वर्षांपासून  बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती अतिशय डबघाईला आली आहे. त्यामुळे बँकेचे ग्राहक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बॅंक आर्थिक डबघाईतून बाहेर काढून शेतकऱ्यासह अन्य ग्राहकांना त्याचा लाभ होण्यासाठी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने स्विकारावे, अशी मागणी राजकिशोर मोदी यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. बीड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांना  मोदी यांनी जिल्हा बँकेच्या आर्थिक परिस्थिती बाबत अवगत केले. त्या बँकेमुळे जिल्ह्यातील हजारो ग्राहक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. कित्येक ग्राहकांनी या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या देखील केल्याचे मोदी यांनी अजितदादा यांना अवगत केले. 

           गेली काही काळापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्थिक परिस्थिती मुळे बँकेचे ठेवीदार, शेतकरी, छोटे व्यापारी, नोकरदार, निवृत्त कर्मचाऱ्यांचे कोट्यावधी रुपये या बॅंकेत अडकले आहेत. त्यामुळे त्यांचा आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाल्याने येथील ग्राहकांच्या कुटुंबांवर देखील याचा विपरित असा परिणाम झाला आहे. यामुळेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने या बॅंकेचे पालकत्व स्विकारुन ही बॅंक आर्थिक तोट्यातून बाहेर काढावी. जेणेकरून त्याचा फायदा जिल्ह्यातील लाखो ग्राहक तसेच शेतकऱ्यांना होणार असल्याचे राजकीशोर मोदी म्हणाले.  राजकिशोर मोदी यांनी बँकेविषयी केलेल्या मागणीवर गांभीर्याने विचार करू तसेच महाराष्ट्र  राज्य सहकारी बँकेचे (शिखर बँक) अधिकारी या बँकेत पाठवून बँकेस आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करू असा सकारात्मक  प्रतिसाद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्याचे मोदी यांनी यावेळी सांगीतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!