परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 जिजामाता विद्यालय धर्मापुरी शाळेला मिळाले मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा चे पारितोषिक

परळी (प्रतिनिधी )

          इंद्रायणी प्रतिष्ठाण संचलित जिजामाता विद्यालय धर्मापुरी या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत रुपये एक लाखाचे नगदी रोख पारितोषिक मिळाले. या शाळेचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे .

         शासनाच्या शिक्षण उपक्रमांतर्गत सन 2024 - 25 या शै . वर्षात जिजामाता विद्यालयाने सहभाग नोंदविला होता. या विद्यालयाला तृतीय क्रमांकाचे रू . १ लाखाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले .

          वर्षभर शाळेमध्ये विविध कार्यक्रम - उपक्रम राबविण्या त आले . सुंदर परस बागेची निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा, शाळा परिसर स्वच्छता, गावातील रस्ते स्वच्छता अभियान, सुलभ प्रवेश प्रक्रिया, आरोग्य तपासणी, प्रबोधन कार्यक्रम, तक्रार पेटी ,पुस्तक पेढी, स्पर्धा परीक्षा, शासनाच्या विविध योजना, विज्ञान प्रयोग शाळा, सी सी टीव्ही कॅमेरे, स्वच्छता गृह यांसह शासन परिपत्रकानुसार सर्व बाबींची पूर्तता उस्फुर्तपणे करण्यात आली . प्राचार्य रामहरी गिते यांच्या कुशल मार्गदर्शन व उत्कृष्ट नियोजनानुसार शाळेतील प्राध्यापक वृंद, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी एवढेच नव्हे तर परिवहन व्यवस्था सांभाळणारे ॲटो चालक, पोषण आहार कामगार, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांचे दैदिप्यमान सहकार्य तसेच संस्था पदाधिकारी यांची खंबीर साथ आदिं बाबीं मुळे विद्यालयाला हे यश मिळविता आले .

          गटसाधन केंद्राचे श्री बालासाहेब दहिफळे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात हा धनादेश प्राचार्य गिते यांना प्रदान करण्यात आला . यावेळी

   पर्यवेक्षक बी. टी आघाव, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हणुमंत कराड, संजय फड यांची उपस्थिती होती 

           विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्ल संस्थेचे सचिव विजय कुमार नागरगोजे, संचालिका डॉ सौ . सरस्वती नागरगोजे व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सन 2024 - 25 मध्ये राबविले विविध उपक्रम

* प्राचार्य आर . एस . गिते यांचे उत्कृष्ट नियोजन

* संस्था पदाधिकाऱ्यांची खंबीर साथ

* सुंदर परसबाग, सांस्कृतिक, क्रीडा, परिसर स्वच्छता, आदिंची पूर्तता

* तृतीय क्रमाकांचे रु . १ लाखाचे मिळविले बक्षीस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!