अंबाजोगाईत लिंगायत कोष्टी महिला मंडळाच्या वतीने योग प्रशिक्षण शिबिराला उत्साहात प्रारंभ

अंबाजोगाई/प्रतिनिधी.....

आद्य वचनकार लिंगायत कोष्टी समाज कुलगुरू श्री श्री श्री देवरदासी मैया यांच्या 1046 वी जयंती निमित्त श्री रामलिंग चौंडेश्वरी व नवनाथ महाराज मंदिर (गढीवर), कोष्टी गल्ली, अंबाजोगाई येथे लिंगायत कोष्टी महिला मंडळाच्या वतीने भव्य दिव्य योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात सुरू झाले आहे.

शिबिराचा शुभारंभ माता चौंडेश्वरी देवी व आद्य वचनकार कुलगुरू श्री श्री श्री देवरदासी मैया यांच्या पूजनाने झाला. पूजन विधी सौ. सीमा प्रदीप वरवटकर (महिला अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लिंगायत कोष्टी समाज संस्था, शाखा अंबाजोगाई) यांच्या हस्ते पार पडला.

या योग शिबिरात सौ, रेणुका महाजन,यांनी मार्गदर्शन केले अंबाजोगाईतील अनेक समाज भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. यामध्ये सीमा शेंगोळे, मीराताई मसनाळे, , अरूणा हरदास, अंजली उमराणे, किशोरी शेंगोळे, श्रद्धा मसनाळे रूपाली आगलावे,श्रुती बिरंगे, मुक्ता चिमनगुंडे,ज्योती चिमनगुंडे, संचीता चौधरी,स्वाती हरदास यांच्यासह लिंगायत कोष्टी समाज संस्थेच्या अनेक महिला भगिनींनी उपस्थिती लावली.

या शिबिराद्वारे शारीरिक व मानसिक आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्याचा उद्देश असून, महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहे. समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाभ्यासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !