परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

जबरी चोरी...पोलीसांना तपासाचे आव्हान !

वयोवृद्ध जोडप्याचा बीड-परळी- सोनपेठ एसटीने प्रवास: बोरमाळ,गंठण,मोहनमाळ व नेकलेस असे सुमारे ९ लाखांचे सोन्याचे दागिने पळवले !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      बीडहून परळी आणि परळीहून सोनपेठ येथे एसटीने प्रवास करणाऱ्या सोनपेठ येथील रहिवासी वयोवृद्ध जोडप्याला मोठ्या बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागले असुन आयुष्यभर पै पै जमा करून कमविलेले सोन्याचे तब्बल ९लाखाचे दागिने चोरीला गेल्याची घटना दि.१० रोजी घडली आहे.याप्रकरणी आता परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला माधुरी सुर्यकांत परळकर वय ६० वर्षे रा.महाजनगल्ली सोनपेठ यांनी संपूर्ण हकिकत नोंदवली आहे.त्यानुसार फिर्यादी महिला व त्यांचे पती हे छ. संभाजीनगर येथे आपल्या मुलीकडे गेले होते. दि. 10/4/2025 रोजी सकाळी 11.00 वा.  संभाजीनगर येथून एस.टी. बसने बीडला आले. बीड येथून  सोनपेठला जाण्यासाठी बीड- परळी बसने दुपारी 12.000 वा. बीड येथून निघून परळीला दुपारी सव्वा दोन ते आडीच वा. सुमारास बस स्थानकात आले.  सोनपेठची बस गेली होती. म्हणुन त्यांनी परळी बस स्थानकावर उसाचा रस घेतला व दुपारी तीन वाजताच्या सुमारास परळी- सोनपेठ  बसने सोनपेठला गेले. घरी गेल्यावर  बॅग तपासली असता बॅग मधील लाल पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने  दिसले नाहीत. या पर्समध्ये
1)कि. अंदाजे 3,00,000-(रु) एक खर्बुज्या मन्याची तिन पदरी मोहन माळ सोन्याची राहा तोळे वजनाची जुनी वापरती 2)किं. अंदाजे 3,00,000-(रु) एक सोन्याची पट्टी गंटन राहा तोळे वजनाचे जुने वापरते
3किं. अंदाजे 2,00,000 रु.- एक नेकलेस साखळी पॅडॉलचे सोन्याचे पॅडॉलमध्ये लाल खडा असल्याले चार तोळे वजनाचे जुने वापरते 4किं. अंदाजे 1,00,000 रु. एक सोन्याची बोरमाळ त्यात डिसको मनी असल्याले दोन तोळे वजनाची जुनी वापरती असे एकुण 9,00,000-00 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले.
     याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व सहकारी करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!