बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचा खरा चेहरा उघड
उसने म्हणून १० लाख रुपये खात्यावर पाठवलेले गुत्तेदार सुदर्शन काळे यांची पोलिसात तक्रार
मुलाच्या फी भरण्यासाठी डिसेंबर महिन्यात घेतले होते पैसे, पुराव्यांसह काळेची तक्रार
याच दहा लाखांवरून कासले करत होता भलतेच आरोप, सर्व आरोप खोटे निघाले
बीड (प्रतिनिधी) - बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. रणजित कासले स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता, ते पैसे मुळात अंबाजोगाई येथील संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन चे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत आता सुदर्शन काळे यांनीच स्वतः पोलिसात पैसे दिल्याच्या पुरावा सहित तक्रार दाखल केली आहे.
रंजीत कासले हा पोलीस उपनिरीक्षक असताना मागील वर्षी अंबाजोगाई येथे कार्यरत होता, त्या काळात आपली त्याच्याशी ओळख झाली. डिसेंबर 2024 मध्ये रणजीत कासले याने आपल्या लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या फीची अडचण असल्याचे सांगत दहा लाख रुपयांची उसनवारी ने मागणी केली.
एका कामाचे बिल आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक खात्यावर ते दहा लाख रुपये पाठवले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी मला दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवण्याचा आग्रह केला होता मात्र मी तसे न करता वैयक्तिक त्यांच्याच बँक खात्यावर पैसे पाठवले. त्यांनी लवकरच ते पैसे परत देतो, असे सांगितले होते. साधारण दीड ते दोन महिने उलटल्यानंतर मी त्यांना पैशाची परत मागणी केल्यावर त्यांनी टाळाटाळ केली.
माझे पैसे मला गरजेच्या वेळी परत न दिल्यास मी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले, किंवा त्यांनी गुजरात मधून मला काही रक्कम पाठवली. तसेच सायबर ठाण्यातील गिरी नामक कर्मचाऱ्यांच्या हाताने दोन लाख रुपये, असे तीन वेळा मिळून साडे सात लाख रुपये परत दिले आहेत. तर उर्वरित अडीच लाख रुपये परत मिळवून द्यावेत, अशी मागणीही काळे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सुदर्शन काळे यांनी आपल्या तक्रारी सोबत कासले याला पैसे पाठवल्याचे पुरावे देखील जोडले आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासन कासले वर काय कारवाई क याकडेही आता लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा