अंबाजोगाई शहर हे महाराष्ट्रातील तिसरे "पुस्तकाचे गाव" म्हणून *जाहीर अंबानगरि चे भाग्यविधाते राजकिशोर पापा मोदी यांच्या मागणीला अखेर यश

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)

       समस्त अंबाजोगाईकरांची बऱ्याच दिवसांपासून मागणी  होती की अंबाजोगाई शहर हे पुस्तकांचे गाव जाहीर करावे.


अबांनगरीचे भाग्यविधाते राजकिशोर पापा मोदी यांनी वैयक्तिक कॅबिनेट मंत्री उदय सामंत  व माजी मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. आणि सतत पाठपुरावा केल्यानंतर,

आज बीड शहरात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत  आले असता त्यांनी अंबाजोगाई शहर तिसरे कवींचे गाव असे जाहीर केले. 

अंबाजोगाई शहर सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व पर्यटन दृष्ट्या सक्षम असून लेखन साहित्यिक व वाचन प्रेमींचा या शहरात भेटणार वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे.


 त्यामुळेच  अंबाजोगाई शहर हे तिसरे कवींचे गाव या राजकिशोर पापा मोदी यांच्या मागणीला मिळालेलं हे सर्वात मोठं यश असून ही आपल्या अंबाजोगाई साठी आनंदाची बाब आहे. 


याबद्दल समस्त अंबाजोगाई करांच्यावतीने उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत साहेब यांचे राजकिशोर पापा मोदी यांनी आभार मानले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !