........या १८ एजन्सींना राख उचलण्याची परवानगी
थर्मलची राख आता अधिकृत उचलण्यासाठी कार्यवाही: १८ एजन्सींना अधिकृत परवानगी
परळी वैजनाथ: औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपुर येथील बंधाऱ्यातून राख उचण्यात मोठा बदल करण्यात आला आहे. आता शुल्क भरून अधिकृत राख उचलण्यास पात्र 18 निविदाधारक एजन्सीना मंजुरी देण्यात आली आहे. दोन एप्रिल बुधवारी २१ पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये आणि परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या ३० अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राख उपसा करण्यासाठी आवश्यक असणारी पोकलेन मशीन यंत्रणा बुधवारी बंधाऱ्यात निविदाधारक एजन्सी चालकाकडून सोडण्यात आली.
गेल्या तीन महिन्यापासून दाऊतपुर येथील राख बंधाऱ्यातील राख उपसा महाजनकोने बंद केला होता. गेल्या दीड वर्षांपूर्वी राख उपसा करण्यासंदर्भात निघालेल्या निविदा सूचना मध्ये 18 जण पात्र झाले होते त्यासाठी रक्कमही भरण्यात आली होती. या निविदाधारकांना आता शुल्क भरून व गेट पास घेऊन राख उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने बुधवारी थर्मल प्रशासनाने पावले उचलले आहेत. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून थर्मलचे अधिकारी व परळी ग्रामीणचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महानिर्मिती कंपनीने २०२२-२३ चे टेंडर मान्य करत पात्र ई - लिलावाद्वारे निवडलेल्या १८पात्र बोली धारकांना राखीची उचल करण्यास अधिकृत रक्कम भरून परवानगी देण्यात आली आहे.८०% राख तळे ई - लिलावाद्वारे निवडलेल्या १८पात्र बोली धारकांना राखीची उचल करण्यास अधिकृत रक्कम भरून परवानगी देण्यात आली आहे. औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे, उपमुख्य अभियंता महेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 'ॲश यूटीलायझेशन सेलचे' टीम प्रभारी कार्यकारी अभियंता नंदकुमार आंधळे, सहाय्यक अभियंता अरुण गित्ते, गोविंद मुंडे तसेच सुरक्षा विभाग वरिष्ठ व्यवस्थापक बी.आर. अंबाड आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात राख उचलण्यास सुरुवात झाली आहे.
या १८ एजन्सींना राख उचलण्याची परवानगी
औ.वि.केंद्राच्या राखेच्या तळ्यातील राख ३५३ प्रतिटन या प्रमाणे आर्यन प्लाय ॲश ब्रिक्स, विभु सप्लायर,शिवम कन्स्ट्रक्शन, तिरुपती हायटेक इन्फ्रा,तुषार फॅब्रिकेटर्स ॲण्ड कन्स्ट्रक्शन,साईनाथ विट उद्योग समुह, सिध्देश्वर कन्स्ट्रक्शन,समाधान ब्रिक्स फॅक्ट्री, सिध्दी कन्स्ट्रक्शन,प्रविण ब्रिक्स फॅक्ट्री,आस्था इन्फ्रास्टक्चर,मारोती सोडगिर, एस.के. लॉजेस्टीक, महादेव गडदे,एस सेल्स ॲण्ड सर्विसेस, ऐस्कॉन एनर्जी सोल्युशन,श्रेयस इन्टरप्रायजेस या पात्रताधारक एजन्सींना राख उचलण्याची परवानगी मिळाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा