ना.पंकजा मुंडेंचा परळीत जनता दरबार ; जनतेच्या समस्यांचा जागेवरच निपटारा
परळी वैजनाथ।दिनांक ०३।
राज्याच्या पर्यावरण, वातारणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांचा आज परळीत हाऊसफुल्ल जनता दरबार झाला. त्यांना भेटून समस्या मांडण्यासाठी यशःश्री निवासस्थान अक्षरशः गर्दीने फुलून गेले होते. ना. पंकजाताईंनी प्रत्येकाला वैयक्तिक भेटून त्यांची गाऱ्हाणी ऐकली व त्यांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.
ना. पंकजा मुंडे यांचे बुधवारी रात्री उशीरा शहरात आगमन झाले. आज सकाळपासूनच यशःश्री निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी मतदारसंघातील, जिल्हयातील तसेच जिल्हया बाहेरून नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आलेल्या प्रत्येकांना भेटत, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांनी जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुण्याईचा वसा अन् वारसा जबाबदारीने पुढे नेण्याची प्रेरणा देणारी ही गर्दी होती. सत्तेतील मंत्रीपदाचा वापर तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल असं त्या यावेळी म्हणाल्या.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा