परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

कोल्हापूरचे श्वानप्रेमी शिंदे कुटुंब अन् या श्वानपिलांची काय आहे कहाणी....?

प्राणीमात्रांचा जिव्हाळा अन् पशुसंवर्धन मंत्र्यांचं पशुधना विषयीचं मातृवत 'वात्सल्य' आलं समोर !

पंकजा मुंडेंनी स्विकारलं दोन गोड पिल्लांचे पालकत्व:'प्रिती व रोझी' च्या गृहप्रवेशाचं ह्रदयस्पर्शी स्वागत !


परळी वैजनाथ |विशेष प्रतिनिधी|दि.२८...

    राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री  पंकजा मुंडे यांची संवेदनाशीलता सर्व परिचित आहे. त्याचबरोबर त्यांचे श्वानप्रेमही सर्वांना ज्ञात आहे.एक व्यासंगी, परखड वक्ता, अभ्यासू खंबीर लोकनेता अशी प्रतिमा असलेल्या पंकजा मुंडे यांच्या अतिशय संवेदनाशील व मातृवत वात्सल्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाची अनुभूती अनेकवेळा येते.असाच काहीसा प्रसंग काल बघायला मिळाला. या प्रसंगातून व्यक्ती म्हणून पंकजा मुंडेंचा प्राणीमात्रांबद्दलचा जिव्हाळा अन् पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणून पशुधनां विषयीचे त्यांचे मातृवत 'वात्सल्य'  समोर आले आहे.

         कोल्हापूर येथील श्वानपालक सोनाली शिंदे यांनी स्वतःच्या घरी लेकरं सांभाळावे या पद्धतीने आठ श्वानांच्या पिल्लांचा सांभाळ केलेला होता.यापैकी दोन पिल्लं त्यांनी पंकजा मुंडे  यांना देवू केली.श्वानप्रेमी असलेल्या पंकजा मुंडे व त्यांचा सुपूत्र आर्यमन यांना याचा अतिशय आनंद झाला.या नविन दोन श्वानांच्या आगनमनाचा उत्साह व उत्सुकता त्यांना लागलेली होती. अतिशय भावनिकतेने व जिव्हाळ्याने कोल्हापूर येथील श्वानपालक सोनाली शिंदे यांनी या पिल्लांचा सांभाळ केलेला होता. त्यांनाही या पिल्लांचा विरह सहन होणारा नव्हता. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेत कोल्हापूरहून मुंबई पर्यंतचा प्रवास करत शिंदे कुटुंब ही पिल्लं घेऊन आली. पंकजा मुंडे यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी या पिलांना आणण्यात आले.

      यावेळी सोनाली शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंनी कृतज्ञतापूर्वक अतिशय प्रेमाने स्वागत केले. त्याचबरोबर त्यांनी आणलेल्या रोझी आणि प्रिती या दोन श्वान पिलांचे मातृवत स्वागत केले. आपल्या कुटुंबात नव्या सदस्यांचे  स्वागत करावे असे अतिशय उत्साहात प्रिती आणि रोझीच्या गृहप्रवेशाचा एक छोटेखानी आनंदी सोहळा यावेळी साजरा करण्यात आला. पंकजाताई मुंडे यांनी हळद कुंकू लावून त्यांचं आत्मीय स्वागत केलं. मुक्या प्राण्यांनाही आत्मिय ओढ असते आणि विरहाची पण संवेदना असते. हे या एकाच  भावनिक प्रसंगात दिसुन आले. कोल्हापूरच्या मोकळ्या वातावरणात जडणघडण झालेली व राहिलेली ही पिले मुंबईच्या वातावरणात कशी राहतील असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना मात्र पंकजा मुंडे यांच्या सहवासात व  जिव्हाळ्याने ही पिले त्यांना लगेचच बीलगल्याचे दिसून आले. शिंदे कुटुंबीय या पिलांना सोडून गेल्यानंतर या पिलांना सुरक्षित वाटावे यासाठी स्वतः पंकजा मुंडे व त्यांचा मुलगा आर्यमान यांनी या पिलांना बराच वेळ सहवासही दिला. याबाबतचा एक  व्हिडिओही पंकजा मुंडे यांनी सोशल माध्यमातून शेअर केला. नव्या सदस्यांचे अगदी संवेदनशीलपणाने मातृवत स्वागत आणि काळजी घेतानाच्या पंकजा मुंडे यात दिसून येत आहेत. हे सर्व पाहतांना शिंदे कुटुंबीय अगदीच भारावून गेल्याचे  दिसुन येत आहे.

         दरम्यान सोनाली शिंदे युट्यूबर असुन त्यांनीही एका व्हिडिओद्वारे पंकजा मुंडेंच्या या प्राणीप्रेमाचे व संवेदनाशीलतचे भरभरून कौतुक केले आहे. पोटच्या लेकरांप्रमाणे ज्या पिलांचा आपण सांभाळ केला आता त्यांना अतिशय छान घर आणि पंकजाताईंसारखे मातृवत प्रेम करणारे पालक मिळाल्याचा अतिशय आनंद झाल्याचे म्हटले आहे.

कोल्हापूरचे श्वानप्रेमी शिंदे कुटुंब अन् या श्वानपिलांची काय आहे कहाणी....?

       दरम्यान पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल माध्यमावर काल हा व्हिडिओ टाकल्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे श्वान पिल्लांच्या बाबतीत अतिशय भावनिक असलेले कोल्हापूरचे शिंदे कुटुंब कोण? व या कुटुंबाने सांभाळलेल्या या श्वान पिलांची कहाणी काय? याबाबतची उत्सुकता निर्माण झाली. याबाबत माहिती संकलित केली असता कोल्हापुरातील रहिवासी असलेल्या सोनाली शिंदे व त्यांचे कुटुंब हे स्वामी समर्थ भक्त आहे. सोनाली शिंदे यांचे युट्युब वर अनेक व्हिडिओ लोकप्रिय आहेत. यातून ही आठ श्वान पिल्ले त्यांच्याकडे कशी आली व त्यांचा त्यांनी कसा सांभाळ केला याबाबतची माहिती मिळाली.काही महिन्यांपूर्वी त्यांच्या छोट्या मुलांने काही मित्रांसमवेत नवीन जन्मलेली टोपलंभर पिल्ले घरात आणली. या पिल्लांच्या आईचा शोध घेतला असता, ती आई मिळाली नाही. त्यानंतर मात्र या शिंदे कुटुंबाने या आठही पिलांचा घरातील सदस्यांप्रमाणे व पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केला. याबाबतची दैनंदिन माहिती रोजच त्यांच्या विविध व्हिडिओमध्ये त्यांनी द्यायला सुरुवात केली. यातून ही श्वान पिल्ले चर्चेत आली. यातीलच दोन पिलं ही आता पंकजा मुंडे यांनी घेतली असुन त्यांचे पालकत्व त्या करणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!