वसंतदादा पाटील महाविद्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी
अमोल जोशी / पाटोदा -
येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. त्यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अतिथी प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर हजारे, डॉ. अनिल तळेकर, डॉ. सखाराम वांढरे, उपप्राचार्य प्रो. सतिश माउलगे, उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, कमवि उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ लांडगे, प्रा. मनिषा गाढवे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. कुशाबा साळुंके, प्रो. प्रशांत पाटील, डॉ. पद्माकर ससाणे उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील गरीब व होतकरू अशा पदवीधर विद्यार्थिनीच्या विवाहासाठी कर्मचारी कल्याण समितीच्या निधीतून २५००/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे अशी घोषणा प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांनी याप्रसंगी केली.
सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले. आभार प्रा. मनिषा गाढवे यांनी मानले. अभिवादन कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा