परळीत 'जगमित्र' कार्यालयात  तोबा गर्दी; धनंजय मुंडेंच्या जनता दरबारात जागेवरच अनेकांचे प्रश्न मार्गी !


परळी वैजनाथ- प्रतिनिधी...
          राज्याचे माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी परळीत जगमित्र कार्यालयात प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र आज बघायला मिळाले. धनंजय मुंडेंच्या जनता दरबारात नागरिकांचे जागेवर अनेक प्रश्न मार्गी लागले.
         माजीमंत्री आ. धनंजय मुंडे हे नागरिकांच्या तसेच मतदारसंघातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या समस्या, मागण्या व कामे समजून घेत ते मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. या दृष्टीने नेहमी जनता दरबारात प्रचंड गर्दी असते.या जनता दरबाराच्या माध्यमातून अनेकांची कामे जागच्या जागी मार्गी लागतात, असा आजवरचा अनुभव आहे.याच अनुषंगाने आज धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळपासून धनंजय मुंडे हे जगमित्र कार्यालयात नागरिकांच्या भेटीगाठीसाठी थांबले होते एक मित्र कार्यालयात त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर अनेक प्रश्न जागची जागी मार्गी लावले धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती प्रत्येकाशी संवाद साधत व प्रत्येकाची समस्या जाणून घेत ती सोडविण्याच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी जागेवरच प्रश्न मार्गी लावले धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी आज जगमित्र कार्यालय खचाखच भरल्याचे दिसून आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !