वैद्यनाथ कॉलेजमधील कार्यालयीन अधीक्षक अशोक रोडे सेवानिवृत्त
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील कार्यालयीन अधीक्षक अशोक रोडे हे दि.31 मार्च 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने दि. 02 मे 2025 रोजी महाविद्यालयात सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात आला.
सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. ए आर चव्हाण, उपप्राचार्य प्रा. डी के आंधळे उपप्राचार्य, प्रा.हरीश मुंडे, समन्वयक प्रा. उत्तम कांदे, प्रर्यवेक्षक डॉ.नयनकुमार आचार्य, सत्कारमूर्ती कार्यालयीन अधीक्षक श्री अशोक रोडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात 40 वर्षाची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कार्यालयीन अधीक्षक श्री अशोक रोडे यांचा यथोचित सत्कार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चव्हाण यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी केला. सेवापूर्ती गुणगौरव कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. हरीश मुंडे, डॉ रामेश्वर चाटे, डॉ.व्यंकटेश मुंडे, प्रा एम एल देशमुख, ग्रंथपाल श्री एस ए धांडे,श्री गजानन किटे, श्री पंडित रोडे, यांनी श्री रोडे यांच्या गुणगौरवाबद्दल स्वतःचे मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना श्री अशोक रोडे यांनी स्वतःच्या सेवेकालीन आलेले अनुभव सांगितले. प्रशासन चालविताना अनेक अडचणी येत असतात परंतु त्या योग्य पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे. स्वतःची जडणघडण कशा पद्धतीने झाले या संदर्भात देखील सांगितले.
महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने कामे करावीत असाही संदेश याप्रसंगी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्य ए आर चव्हाण यांनी श्री अशोक रोडे यांनी प्रदीर्घ सेवा महाविद्यालयामध्ये केलेली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांच्याकडे कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात होता तो त्यांनी योग्यरित्या हाताळलेला आहे असे सांगून पुढील कार्यासाठी त्यांना सुख समाधानाचे आयुष्य लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बी एस सातपुते तर आभार डॉ.आर जे चाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा