दिवसाढवळ्या सपासप वार करून हत्या; त्यानंतर स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन कबुली: काय आहे या घटनेमागची खळबळजनक हकिगत?

 माजलगाव, प्रतिनिधी...

      बीड जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. याची कारणेही अतिशय गंभीर असल्याचे समोर येत असते. आज(दि.१५) दिवसाढवळ्या दुपारी दीड ते पावणेदोन वाजण्याच्या सुमारास माजलगावच्या भाजप कार्यालयाच्या काही अंतरावरच भाजपाचे विस्तारक म्हणून काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली.  त्यानंतर हत्या करणारा आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन आपण हत्या करून आल्याचे सांगतो, या अतिशय खळबळजनक घटनेमागची नेमकी हाकिगत आता समोर आली असुन हा खून अनैतिक संबंधातून घडल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

     माजलगाव शहरातील शाहूनगर भागात एका भाजप कार्यकर्त्याची भर दुपारी रस्त्यावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. माजलगाव शहर पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिली आहे.माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील रहिवासी भाजपचे माजलगाव तालुक्यातील विस्तारक बाबा आगे यांचा माजलगाव शहरात दिवसा ढवळ्या खून झाला. यातील आरोपीने सपासप वार करून खून केल्याचा व्हिडिओही सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. आरोपीने स्वतःच पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी इसम नारायण फपाळ माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील रहिवासी आहे. त्याची किट्टी आडगाव ही  सासुरवाडी आहे. भाजपचे विस्तारक बाबा आगे यांचेही हेच गाव आहे. त्यांच्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यात वैमनस्य होते. मिळालेेल्या माहितीनुसार यापूर्वी या विषयावर चर्चा व मिटवामिटवीही झाली होती मात्र आरोपी नारायण फपाळ यांच्या डोक्यात वेळीच चिड होती.गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी मयत बाबा आगेच्या मागावर होता.दरम्यान आज माजलगाव शहरातील शाहू नगरातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या भाजप कार्यालयापासून काही अंतरावर आरोपीने त्यांना गाठले व प्राणघातक हल्ला करत जीवजाईपर्यंत सपासप वार केले. कोयत्याने डोक्यात,शरिरावर वार करून भर वस्तीत, भरदुपारी ही घडली.या मुळे माजलगाव शहर या खून आणि हादरले. खून करणारा आरोपी नारायण फपाळ माजलगाव पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन कोणाची कबुली दिली.

       नारायण फपाळ वय ३८वर्ष रा.बेलुरा येथील रहिवासी आहे. शेती व्यवसाय आहे. दारुचे व्यसनहीआहे. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव ही त्याची सासरवाडी होती.  १मुलगी व  १मुलगा अशी दोन आपत्य आहेत. मागिल २ वर्षापासुन पती-पत्नीचे सतत भांडण तंटे चालू होते. नारायण फपाळ यांच्या सासू-सासर्‍याचे घर व मयत बाबा आगे यांचे घर शेजारी शेजारी असल्याने  त्यांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी अनेक वेळा बाबा आगे असायचे.हा सतत मध्यस्थी का करतो असा सुरुवातीपासूनच  नारायण फपाळ याला संशय होता. मागील तीन महिन्यापासून माहेरी राहत असलेली नारायण फपाळ ची पत्नी सासरी नांदायला आली होती. मात्र तिचे अनैतिक संबंध आहेत ही बाब त्याला सतावत होती.शेवटी त्याने हे गुन्ह्याचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार दिसुन येते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार