इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

आद्य वचनकार लिंगायत हटगर कोष्टी समाज कुलगुरू श्री श्री श्री देवरदासी मैया यांची १०४६ वी जयंती उत्साहात साजरी

अंबाजोगाई/प्रतिनिधी 

आद्य वचनकार लिंगायत हटगर कोष्टी समाज कुलगुरू श्री श्री श्री देवरदासी मैया यांची १०४६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. हा भव्य सोहळा श्री रामलिंग चौंडेश्वरी व नवनाथ महाराज मंदिर (गढीवर), कोष्टी गल्ली, अंबाजोगाई येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माता चौंडेश्वरी देवी व आद्य वचनकार लिंगायत हटगर कोष्टी समाज कुलगुरू श्री श्री श्री देवरदासी मैया यांची सौ. सीमा प्रदीप वरवटकर महिलाअध्यक्ष महाराष्ट्र राज्य लिंगायत हडगार कोष्टी समाज संस्था महाराष्ट्र राज्य, शाखा अंबाजोगाई यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. या पावन सोहळ्यात समाजातील असंख्य बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या श्रद्धेचा आणि एकात्मतेचा ठेवा जपला. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री देवरदासी मैया यांच्या विचारांचा आणि शिकवणीचा महिमा उलगडण्यात आला.

यावेळी विविध मान्यवरांनी समाज एकता, आध्यात्मिक विचारधारा आणि संस्कृतीच्या जतनाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. जयंती उत्सवाने समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करत, भक्तिभाव आणि प्रेरणादायी विचारांची जागृती घडवली.

यावेळी सिमा शेंगोळे,मीराताई मसनाळे,रूक्मिणबाई रूघे, संजीवनी शेंगोळे,...अरूणा हरदास,अंजली उमराणे,किशोरी शेंगोळे,श्रद्धा मसनाळे यांच्यासह अंबाजोगाई लिंगायत हडगार कोष्टी समाज संस्था शाखा अंबाजोगाई चे अध्यक्ष नरसिंह कानडे,शुभंम मसनाळे,गणेश कानडे,राजेंद्र हाट्टे,विलास द्रुकर,संतराम घोळक, नारायण कानडे विष्णु मसनाळे,दिवाकर मसनाळे हनुमंतराव चौधरी ,सुनिल शेंगोळे देवराव हरदास तसेच अंबाजोगाई कोष्टी समाज अध्यक्ष नारायण हरेगावकर,महाराष्ट राज्य लिंगायत हडगार कोष्टी संस्था संचालक प्रविण उमराणे हे उपस्थित होते या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष श्री किशोर गिरवलकर यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे  नियोजन लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्था शाखा अंबाजोगाई यांनी केले होते, या कार्यक्रमास समाज बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!