सामाजिक जाणिवेचा दृढ संकल्प: वडिलांच्या पुण्यस्मरनार्थ गावातील प्रत्येक कन्या विवाहासाठी देणार १० हजार रु.अर्थिक सहयोग!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
आपल्या वडिलांचा राजकीय, सामाजिक, धार्मिक वसा जपत आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरनार्थ गावातील प्रत्येक कन्या विवाहासाठी १० हजार रु.अर्थिक सहयोग देण्याचा दृढ संकल्प मुलांनी केला आहे.अवास्तव आणि सवंग खर्चिक उपक्रमांपेक्षा सामाजिक जाणिवेचा दृढ संकल्प टोकवाडी येथील मुंडे बंधुंनी राबविणार असल्याचे जाहीर केले आहे.
परळी परिसरातील नामांकित व विविध सामाजिक उपक्रमात संपुर्ण आयुष्यभर अग्रेसर राहिलेल्या टोकवाडीचे माजी सरपंच स्व. दशरथ ग्यानबा मुंडे (आबा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम १ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाला.या निमित्ताने ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे दुपारी तसेच रात्रौ गुरुवर्य ह.भ.प.गोपाळ महाराज वास्कर यांचे किर्तन झाले.या कार्यक्रमास नामवंत गायक,वादक, भजनी मंडळ सहभागी झाले. आप्तेष्ट, नातेवाईक, हितचिंतक व स्व.दशरथ आबा यांचे स्नेही, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम राबविण्याचा मनोदय नवनाथ दशरथ मुंडे व गणेश दशरथ मुंडे यांनी व्यक्त केला. सामाजिक जाणीवेचा उपक्रम आयुष्यभर राबविण्याचा निर्धार त्यांनी केला.या अनुषंगाने कन्यादानाला सहयोग देण्याचा पुण्यप्रद संकल्प करुन किर्तनकार महाराजांनी नवनाथ व गणेश यांनी गावातील प्रत्येक कन्या विवाहासाठी १० हजार रु.अर्थिक सहयोग देण्याचा दृढ संकल्प केल्याचे जाहीर केले. या सामाजिक जाणीवेच्या उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात कौतुक केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा