परळीतील सरस्वती नदी प्रकरण: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी बोलावली प्रदूषण मंडळ व न.प.ची संयुक्त बैठक
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी शहरातील पुरातन नदी म्हणून ओळख असलेल्या सरस्वती नदीवरील वाढलेली अतिक्रमणे व घाणीचे साम्राज्य याबाबत गेल्या दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष सरस्वती नदीकाठी जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला खडेबोलही सुनावले होते. सरस्वती नदी पुनर्जीवनाचे काम हाती घेण्याबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंगानेच आता या दौऱ्यात रविवारी पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व परळी नगरपरिषद यांची संयुक्त बैठक बोलावली आहे.
परळी वैजनाथ शहरातील सरस्वती नदीत अवैधरित्या भराव टाकण्याचे होत असलेले काम आणि साचलेल्या घाणीच्या साम्राज्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले होते.दि.४ एप्रिल रोजी सरस्वती नदीची पाहणी करत नदीतील अवैध बांधकाम, अतिक्रमण व साचलेला कचरा याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत लवकरच या सरस्वती नदीचे पुण्याच्या मुळा मुठा नदीच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करू असं त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले होते. नदीवरील अतिक्रमण व गाळ तसेच जागोजागी पसरलेल्या घाणीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर तातडीने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पहाणी करण्यात आली.त्याचा आहवालही सादर करण्यात आलेला आहे.
या अनुषंगाने पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व यरळी नगर परिषद अशी संयुक्त बैठक बोलावली आहे.रविवार दि.२० एप्रिल रोजी सकाळी ११ वा.ही बैठक होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा