अखिल भारतिय पेशवा सं घटनेच्या वतीने जालना येथे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-
अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने रविवारी दि २० एप्रिल २०२५ रोजी जालना येथे सर्वशाखीय ब्राह्मण समाज साठी राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी दि ९ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ब्राह्मण सभा कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला रमेश देहेडकर, ॲड सुनील किनगावकर,संतोष जोशी,विजय काजे,बंकटलाल खंडेलवाल,चंद्रकांत कुलकर्णी, लक्ष्मीकांत दडके यांची उपस्थिती होती. मुला मुलींचे विवाह न होणे हि एक मोठी समस्या होऊन बसली आहे. जालना शहरासह ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे.
या बाबत अ भा पे संघटना महाराष्ट्रभर जनजागृती करून प्रबोधन करीत असून या पूर्वी छत्रपती संभाजीनगर,परभणी, पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावे घेण्यात आले आहेत हे मेळावे यशस्वी झाल्या नन्तर दि २० एप्रिल २०२५ रोजी जालना शहरात चौथ्यांदा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सभा कार्यालयात सकाळी १ ते संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान होणार असून, ॲड सुनील किनगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मेळाव्यात कल्याणराव देशपांडे हे मार्गदर्शन करणार आहेत .
या प्रसंगी लक्ष्मीकांत दडके,संतोष जोशी,श्याम कुलकर्णी, प्रमोद झल्ट, मनोज जोशी,संजय देशपांडे, अभय जोशी,विजय काजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,याशिवाय बीड जिल्हा (अंबाजोगाई) चे सर्वच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या वधू-वर परिचय मेळाव्यासाठी सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील प्रथम वर-वधू,घटस्फोटित,विधवा,विदुर,दिव्यांग याची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी सकल ब्राह्मण समाज यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा