परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व समस्थ ग्रामस्थ आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जमोत्सव (सप्तशतकोत्त्तर सुवर्ण महोत्सव )


श्री क्षेत्र आळंदी देवाची आयोजित भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह मराठावाडा विभागातून भाविक भक्तांनी उपस्थित राहावे-मेंगडे महाराज 


बीड,  प्रतिनिधी...

       श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व समस्थ ग्रामस्थ आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा सप्तशतकोत्त्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तन कारांची सेवा संत चरित्र चिंतन प्रवचन इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव शनिवार दिनांक ३-५-२०२५ ते १०-५-२०२५ या कालावधी मध्ये संपन होत असून पारायण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांची निवास भोजन व्यवस्था श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी च्या वतीने करण्यात येणार असून पारायनार्थी यांना पारायण करण्यासाठी संस्थान च्या वतीने ज्ञानेश्वरी देण्यात येणार आहे तेव्हा मराठवाडा विभागातील भाविक भक्त भागवताचार्य रामायणचार्य गुनिजन यांनी या अनुपम्य सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन बकंटस्वमी संस्थांचे महंत ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे दस्तापूरकर  फडाचे मालक ह.भ.प. अचुत महाराज दस्तापूरकर ह.भ.प. बालासाहेब मोहिते पाटील ह.भ.प.राम महाराज शेळके ( भागवताचार्य ) अखिल भारतीय मराठा महासंघ आध्यात्मिक आघाडीचे तथा जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील ह.भ.प.पंडित महाराज क्षिरसागर आळंदी देवाची ह.भ.प.सुनिल महाराज अंडील इत्यादींनी केले आहे.

     कार्यक्रम दोन सत्रात संपण होणार असुन पहिल्या सत्रात दिनांक ३-५-२०२५ रोजी ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ६ ते १० व १० ते १२ कीर्तन दुपारी ४ ते ५ प्रवचन सायंकाळी ६:३० ते ८:३० कीर्तन त्याच बरोबर दररोज दुपारी १:३० ते ३:३० संत चरित्र चिंतन यामध्ये जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज ३७५ व्या वैकुंठ सोहळ्यानिमित्त जगदगुरु श्री संत तुकाराम चरित्र चिंतन वक्ते ह.भ. प. गाथामुर्ती रामभाऊ राऊत यांची कथा श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सवनिमीत्त चिंतन वक्ते ह.भ.प. चैतन्य महाराज देगलुरकर श्री संत नामदेव महाराज ६७५वा संजीवन सोहळ्यानिमित्त श्री संत नामदेव महाराज चरित्र चिंतन वक्ते ह.भ.प.श्री चंद्रशेखर महाराज देगलुरकर इत्यादींचे कार्यक्रम होणार असून पहिल्या सत्रात हरी कीर्तन ह.भ.प.बापूसाहेब महाराज देहुकर ह.भ.प. श्री अचुत महाराज दस्तपुरकर ह.भ.प.श्री भागवत महाराज शिरवळकर ह.भ.प.श्री प्रसाद महाराज बडवे ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज नामदास ह.भ.प.श्री विठ्ठल महाराज वासकर ह.भ.प. श्री भरत महाराज पाटील यांची कीर्तन सेवा दुपारी ४ते ५ प्रवचन ह.भ.प.श्री चैतन्य महाराज कबीर ह.भ.प.श्री विष्णू महाराज केंद्रे ,ह.भ.प.श्री यशोधन महाराज साखरे ह.भ.प.श्री रामकृष्ण महाराज लाहवित्कर ह.भ.प.श्री डॉ. नारायण महाराज जाधव ह.भ.प.श्री सदानंद महाराज मोरे सायंकाळी ६:३० ते ८:३० कीर्तन ह.भ.प.श्री विश्वनाथ महाराज वारींगे ह.भ.प.श्री प्रमोद महाराज जगताप ह.भ.प.श्री जयवंत महाराज बोधले ह.भ.प.श्री पांडुरंग महाराज घूले ह.भ.प.श्री केशव महाराज उखळीकर ह.भ.प.श्री रामभाऊ महाराज राऊत ह.भ.प.श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर इ. कीर्तन सेवा संप्पण होणार असुन या अनुपम्य सोहळ्याची सांगता शनिवार दिनांक १०-५-२०२५ सकाळी १० ते १२ ह.भ.प.श्री शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांच्या काल्याच्या किर्तांनाने होईल.

       सहभागी होणाऱ्या भविक भक्तांनी स्वतः चे आधार कार्ड व किती लोक सहभागी होणार आहेत याची माहिती कळवावी जेणेकरून आपली भोजन व निवास व्यवस्था सुलभ होईल असे बाब्रूवान शेंडगे पाटील ह.भ.प.श्री राम महाराज शेळके यांनी कळविले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!