टिक टॉक वर मैत्री:अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
पोलिसात एकावर गुन्हा दाखल
माजलगाव-(प्रतिनिधी) शहरातील एका अल्पवयीन मुलीशी टिक टॉक वर मैत्री करत तिच्यावर वेळोवेळी विविध ठिकाणी अत्याचार करून लग्नाचे आमिष दाखवत मारहाण केल्याप्रकरणी पिढीतल्या तक्रारीवरून एक जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका अल्पवयीन मुलीचे टिक टॉक या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून ऋषिकेश दीपक वाघ रा. अंदरसुल ता. येवला जिल्हा नाशिक या युवकाशी 18 फेब्रुवारी 2020 रोजी ओळख झाली. ही ओळख वाढत जात एकमेकांना व्हाट्सअप अकाउंट वरून चॅटिंग सुरू झाली यात सदर युवकाने त्या मुलीची संपूर्ण कौटुंबिक माहिती मिळवत तिला व्हाट्सअप वर मेसेज टाकून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तिला तिचे नग्न फोटो मागून घेतले त्यानंतर तीला भेटण्यासाठी अंदरसुल या ठिकाणी बोलवून तिच्याशी लगट केली. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2019 रोजी मला तुझ्याशी लग्न करायचे आहे भेटायला ये असे म्हणत वारंवार फोन लावल्याने सदर मुलगी मैत्रिणीस घेऊन अंदरसुल येथे भेटावयास गेली असता मिञ अंकुश घोडेराव यास सोबत घेत नाशिक परिसरात लाॅजवर ठेवत लगट केली.तर संभाजीनगर येथे बोलवून अनैसर्गिक कृत्य केले. व लग्न केव्हा करणार असे विचारले असता बेल्टने मारहाण करत वेळो वेळी पैसे घेतले.व लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला.व जास्त बोललीस तर तुझे नग्न फोटो नातेवाईकांना पाठवेल अशी धमकी देत असल्याने सदर मुलीने समाजसेविका सत्यभामा सौंदरमल यांना घेऊन शहर पोलीसात ऋषिकेश दीपक वाघ रा. अंदरसुल तालुका येवला जिल्हा नाशिक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय महेश किशोर भोसले हे करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा