नद्यांवर चढाई करणाऱ्यांवर प्रतिबंध करा !
अतिक्रमणमुक्त करुन सरस्वती व घनशी नदीचे पुनर्जीवन करुन सुशोभीकरण करा !
भाजप शहराध्यक्ष माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया सरसावले
परळी वैजनाथ (प्रतीनिधी)÷ पुरातन काळापासून प्रभु वैद्यनाथाच्या पावन भुमीत असलेल्या व जुन्या गांव भागातुन वाहणाऱ्या सरस्वती व घनशी चे अतिक्रमणमुक्त करुन पुनर्जीवनकरा.या नद्यांचे सुशोभीकरण करण्यात यावे व या नदीत झालेले अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करण्यात यावा अशी मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या कडे एका निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केली आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून नद्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे .अधिकाधिक नद्यांचे पुनर्जीवन, खोलीकरण, सपाटीकरण पाञ विस्तारित करणे आदि बाबिंना प्राधान्यक्रम देण्यात येत आहे.जास्तीत जास्त नद्या उपनद्या, ओढे,नाले प्रवाही करण्यावर केंद्र व राज्य शासनाकडून भर दिला जात असताना परळीत नद्यांचे स्वरुप माञ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत आहे.या बाबींवर प्रशासक व मुख्याधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी व पुरातन काळापासून असलेल्या या दोन्ही नद्यांचे पुनर्जीवन करुन सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी लोहिया यांनी केली असुन याबाबत लवकरच पशुसंवर्धन व पर्यावरण मंञी पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, जिल्हाधिकारी, यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती लोहिया यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा