श्री. योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस ८५.२१ लाखाचा नफा
अध्यक्ष माणिकराव वडवणकर यांची माहिती
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-
ग्राहक हेच दैवत तसेच सर्वांना आपलं माननारी शहरवासीयांची मिनी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च २०२५ अखेर रुपये ८५.२१ लक्ष एवढा निव्वळ नफा मिळाला आहे. ग्राहकांच्या दृढ विश्वासाने ५२ कोटीच्या ठेवी मिळवत श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च २०२५ अखेर ८५.२१ लक्ष रुपयांचा नफा मिळवला असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवणकर, उपाध्यक्ष मनोज लखेरा आणि व्यवस्थापक गजानन कुलकर्णी यांनी दिली आहे. पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांचे बहुमूल्य आणि नियोजनबध्द व अभ्यासु मार्गदर्शन यांच्या बळावरच आज पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरू असल्याची माहिती जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेची मार्च २०२५ अखेरची वित्तीय स्थिती पुढीलप्रमाणे मांडली आहे. त्यामध्ये पतसंस्थेकडे एकूण २२५१ एवढे सभासद असून, पतसंस्थेचे एकूण भाग भांडवल रुपये ३ कोटी एवढे आहे . पतसंस्थेचा स्वनिधीं हा रुपये ६.३५ कोटी एवढा असून पतसंस्थेकडे सभासदांच्या तसेच ग्राहकांच्या एकूण ठेवी रुपये ५२ कोटी एवढ्या आहेत. तर सभासद व ग्राहकांना मार्च २०२५ अखेर पर्यंत कर्ज वाटप रुपये ४५ कोटी एवढे करण्यात आले असून पतसंस्थेची अंबाजोगाई पिपल्स बँक व अन्य ठिकाणची गुंतवणूक ही रुपये २५ .४८ कोटी एवढी असून ३१ मार्च २०२५ अखेर(आर्थिक वर्ष २०२४- २०२५) पतसंस्थेस रुपये ८५.२१ लक्ष रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवनकर यांनी दिली आहे.
श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही साधारणपणे पस्तीस वर्षापूर्वी एका छोट्याश्या खोलीत केवळ १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर चालू करण्यात आली होती . पतसंस्थेच्या काटेकोर नियोजन , संस्थापक राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शन त्याचबरोबर सभासद , ठेवीदार व ग्राहकांच्या अतूट विश्वासाच्या बळावर श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने रुपये दहा हजारावरून आज ५२ कोटीचा टप्पा गाठला आहे . पतसंस्थेने हजारो छोटे मोठे व्यवसाईक , हातगाडी, फेरीवाले, भाजीपाला व फळविक्रेत्याना आर्थिक सहाय्य करून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मदत करून त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सदैव प्रयत्न केला आहे . तसेच वेळोवेळी सभासदांबरोबरच इतर ग्राहकांच्या मुलांमुलींच्या शिक्षणासाठी , लग्नासाठी , घर बांधकाम करण्यासाठी तसेच नवीन जागा खरेदी करण्यासाठी देखील पतसंस्थेकडून वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे . श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही वेळोवेळी अर्थार्जनासोबतच अनेक सामाजिक , शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असते. पतसंस्थेच्या वतीने प्रतिवर्षी गरीब ,होतकरू व दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. श्री योगेश्वरी नागरी पतसंस्थेची मातृबँक ही अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक म्हणून कार्यरत आहे . श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही आजच्या घडीला केवळ पतसंस्था राहिली नसून ती एक मिनी बँक म्हणूनच ओळखल्या जाऊ लागली आहे .
श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था नावारूपाला आणण्यासाठी पतसंस्थेचे सर्व ग्राहक , सभासद , ठेवीदार तसेच ch कर्जदार यांच्यासह संस्थापक राजकिशोर मोदी , अध्यक्ष माणिक वडवणकर , उपाध्यक्ष मनोज लखेरा , तसेच संचालक कचरूलाल सारडा, ब्रह्मचारी इंगळे , सुनील वाघाळकर , रुपेश चव्हाण , शिरीष भावठाणकार, शेख अब्दुल शेख करीम , सय्यद अमजद , कल्याणी राहुल देशपांडे , जयश्री बाळासाहेब घाडगे यांच्यासह ऍड दयानंद लोंढाळ, जावेद छोटू गवळी तसेच पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व पिग्मी प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात उल्लेखित केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा