पुराला कारणीभूत ठरणारे सरस्वती नदीवरील शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून टाकण्यात यावे - अश्विन मोगरकर

परळी वैजनाथ,प्रतिनिधी....

अंबेवेस भागातील सरस्वती नदीतील शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे पावसाळ्यात गावभागाला पुराचा धोका निर्माण होतो. हा धोका टाळण्यासाठी सरस्वती नदीत बांधण्यात आलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून टाकण्यात यावे अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

परळी वैजनाथ गावभागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीवर अकरा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या माध्यमातून या सरस्वती नदीला नाला ठरवत यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम सुरू करण्यात आले. नदीवर कुठलेही बांधकाम करायचे असेल तर परवानगी मिळत नसल्याने शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी या पवित्र सरस्वती नदीला नाला ठरवण्याचे पाप केले गेल्याचा आरोप अश्विन मोगरकर यांनी केला आहे. 

नागरिकांनी विरोध केल्याने या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम बंद पडले आहे. मागील अकरा वर्षांपासून उभारलेल्या या बांधकामामुळे अनेक वेळा याच्या पिलरला कचरा अडकून लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. अंबेवेस परिसरात यामुळे नदीत कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत आहे तसेच डासांचाही त्रास वाढला आहे.

अकरा वर्षांनंतर पाण्यात उभे असलेले हे बांधकाम कमकुवत सुद्धा झाले असेल पावसाळ्यातील मोठ्या पुरामुळे ते पडण्याची शक्यता आहे. या बांधकामाचा आधार घेत नदीत अतिक्रमण सुद्धा वाढत आहेत. परळी शहरातील जुन्या गावभागातून पौराणिक महत्व असलेली पुरातन सरस्वती नदी वहाते. या नदीची भाविक मनोभावे पूजा सुद्धा करीत असतात. परळी जवळच ब्रम्हगंगा, वेणूमती व परळीतून वाहणाऱ्या सरस्वती नदी या तिन्ही नदीचा संगम होतो. कालपरत्वे बारमाही वाहणारी नदी पावसाळयाच्या काळात चार-पाच महिने अजून सुद्धा वहात असते. पौराणिक महत्व असलेल्या या सरस्वती नदीला राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पाहणी करत नदी पुनर्जीवित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरस्वती नदीतील हे अनधिकृत शॉपिंग कॉम्प्लेक्स नगरपरिषदेने स्वतःहून काढून टाकावे. परळीतील गावभागातील नागरिकांचे पुरापासून संरक्षण करावे या मागणीचे निवेदन गुरुवार, दि 17 एप्रिल रोजी परळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांना भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार