परळीच्या संभाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी !
एकदा हरवलेला मोबाईल सापडतच नाही, हा परळीत दृढ झालेला समज पो.नि.धनंजय ढोणेंनी ठरवला खोटा !
गतिशील तपास:गहाळ झालेले १३ मोबाईल शोधून केले परत
परळी (प्रतिनिधी)दि.४ :
नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्याची उल्लेखनीय कामगिरी परळीतील संभाजीनगर पोलिसांनी केली आहे. नागरिकांकडून मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलीस ठाण्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. या तपासादरम्यान, १३ मोबाईल परत मिळवून त्यांच्या मूळ मालकांना शुक्रवारी (दि.४) सुपूर्द करण्यात आले.
संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोबाईल शोधकार्य सुरू केले. विविध मोबाईल कंपन्यांचे एकूण १३ मोबाईल, ज्यांची एकूण किंमत ३,२५,००० रुपये होती, ते परत मिळवण्यात यश आले. तक्रारदारांनी त्यांचे मोबाईल शोधून परत मिळाल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे टेक्निकल ॲनालिसिसचे कामकाज पाहणारे पो.कॉ.व्यंकटी खाडे, बीडचे टेक्निकल ॲनालिसिस सेलचे पो.कॉ.विकी सुरवसे यांनी मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, १३ मोबाईल परत मिळवून त्यांच्या मूळ मालकांना शुक्रवारी (दि.४) सुपूर्द करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
गहाळ मोबाईल परत दिलेल्या तक्रारदारांची नावे
वसीम सलीम शेख, गणेश राजेभाऊ कोकीळ, कानिफनाथ साधू बनसोड, राधा देविदास कांबळे, तानाजी अंकुश मुळे, राजाराम लक्ष्मण गित्ते, उमाजी चंदू चव्हाण, दिनेश प्रभाकर दहिरे, राजेश पंकज गायकवाड, सचिन ईश्वर कागदे, गहिनीनाथ गुलाबराव शेप, बाबासाहेब सुर्यभान बळवंत सौदागर अंबाजी कांदे अशी गहाळ मोबाईल परत मिळालेल्या तक्रारांची नावे आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा