ज्ञानाला अर्थार्जनाचे साधन बनवणे आवश्यक - प्राचार्य आबासाहेब हांगे
अमोल जोशी / पाटोदा - केवळ विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करून स्वस्थ बसून राहण्यात अर्थ नसतो तर प्राप्त केलेल्या ज्ञानाला अर्थार्जन करण्याचे साधन बनवणे आवश्यक असते. विविध वनस्पतींच्या औषधी उपयुक्ततेचे मिळवलेले ज्ञान विद्यार्थ्यांनी अर्थार्जनासाठी वापरावे असे प्रतिपादन प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित दोन महिने कालावधीच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
१ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर अनिता धारासूरकर, प्रोफेसर गणेश पाचकोरे होते. 'फार्माकोग्नोसी अँड इथनोबॉटनी' हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या अभ्यासक्रमात २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. अभ्यासक्रम यशस्विरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
नियमित अभ्यासक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकून अर्थार्जनाची विविध साधने निर्माण करावीत असे आवाहन प्राचार्य आबासाहेब हांगे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. गणेश पाचकोरे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा