परळी वैद्यनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासा साठी २५.७ कोटी रुपये निधी मंजूर

परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

     बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५.७ कोटी रुपये निधी मंजूर  करण्यात आले आहेत.प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधा सह या भागातील दळणवळण सोयीस्कर व गतिमान होण्यास याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. 

         राज्यातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.त्याअंतर्गत परळी वैद्यनाथ रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकास कामासाठी २५.७ कोटी रुपये निधी आता  मंजूर करण्यात आलेला आहे.रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे आ.धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधा सह या भागातील दळणवळण सोयीस्कर व गतिमान होण्यास याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !