इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 बीडचे भूमिपुत्र भरत गिते यांची  ‘प्रासंगिक’ कार्यक्रमात बुधवारी सकाळी ११ वाजता बीड आकाशवाणी केंद्रावर मुलाखत


बीड (प्रतिनिधी) :- 

         उद्योग क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविणारे ॲल्युमिनियम मॅन बीड -परळीचे भूमिपुत्र उद्योजक भरत गित्ते यांची  ‘प्रासंगिक’ कार्यक्रमात बुधवारी दि. २३ एप्रिल रोजी बीड आकाशवाणी केंद्रावर मुलाखत ऐकण्यासाठी प्रसारण होणार आहे. तरी सर्वानी जरूर ऐकावी असे आवाहन कारण्यात आले आहे. 

         स्वतःच्या कामाप्रती निष्ठावंत राहून प्रामाणिकपणाने ध्येय उराशी बाळगून यशाला गवसणी घालणे शक्य आहे. मात्र त्यासाठी निराशा झटकली पाहिजे. 

आपला दृष्टिकोन न्याय निवाडा करण्यापेक्षा सकारात्मक गोष्ट निवडण्यासाठीचा असावा. यातूनच कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. सर्वांसाठी प्रेरक होईल अशा पैलूंना उलगडून दिला आहे. 

परळीचा भूमीपुत्र असलेले उद्योजक भरत गिते यांनी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सामंजस्य करार केला. आशा अनेक उपयुक्त बाबी,  विविध आणि चौफेर मुद्द्यांवर या मुलाखतीच्या माध्यमातून  प्रासंगिक या कार्यक्रमात  बीड-परळीचे भूमीपुत्र, भारताच्या परदेशी गुंतवणूकीचे सल्लागार, ज्यांना 'मॅन ऑफ अल्युमिनियम' म्हणून ओळखलं जातं असे भरत गिते यांची डॉ. संपदा कुलकर्णी यांनी  मुलाखत घेतली आहे. 

मुलाखत प्रसारण - बुधवार, दि. २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता 

आकाशवाणी (१०२.९ MHz)बीड केंद्रावर होणार आहे. यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #Newsonair हे मोबाईल ऍप्लिकेशन.

• Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867

• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=164  यावर ऐकण्या साठी प्रसारित होणार आहे. तरी सर्वांनी ही मुलाखत जरूर ऐकावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!