इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 महिला महाविद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 



परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)


    येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आज दि . १४ एप्रिल  रोजी विश्वरत्न , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

               या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव  रवींद्र देशमुख उपस्थित होते तर कोषाध्यक्ष प्रा . प्रसाद देशमुख हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले . संस्थेच्या संचालिका सौ छायाताई देशमुख तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे यांचीही विशेष उपस्थिती होती .

                मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे यांनी प्रास्ताविक केले . त्यांत त्यांनी  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या  विविध क्षेत्रातील कार्याचा सार्थ

आढावा घेतला .

     प्रमुख व्याख्याते प्रा . प्रसाद देशमुख यांनी *उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे -* या उक्तीची यथार्थता आपल्या वक्तव्यातून सिद्ध केली .  संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग दलित दुःखित पीडित , शोषित यांच्या उद्धारासाठीच करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते असे त्यांनी प्रतिपादन केले . यासोबतच चवदार तळे , काळाराम मंदिर सत्याग्रह या सह अनेक अस्पृश्यता निवारण करणाऱ्या संघर्ष कार्याचाही आढावा घेतला .

अध्यक्षीय समारोप करताना आपल्या काव्यमय शैलीत -


मनात न ठेवता कुठलीही आढी ।उत्साहाने घडविली साक्षरतेची पिढी ॥ 

शिक्षणाच्या माध्यमातून देशाला दिला उत्तम आकार ।

आज त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने झाले साकार ॥


देशाच्या उन्नतीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड परिश्रम घेतले .आपल्या कठोर परिश्रमातून देशाला एक सार्थ सर्वसमावेशक अशी घटना दिली हे त्यांचे अत्यंत महनीय कार्य आहे . असे विचार  कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र देशमुख यांनी अध्यक्षीय समारोपात  मांडले . .

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.डॉ.पी. व्ही. गुट्टे यांनी केले तर प्रा.डॉ.एस.व्ही. कचरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी डॉ . अरुण चव्हाण  डॉ. विलास देशपांडे  डॉ . विद्या गुळभिले डॉ रागिणी पाध्ये  डॉ .रंजना शहाणे डॉ . वर्षा मुंडे   प्रा. प्रवीण फुटके '  प्रा. प्रवीण नव्हाडे , श्री अनिल पत्की श्री सुहास कण्व श्री एन. जी.फुलारी  श्री विकास देशपांडे  आदींची उपस्थिती होती .  महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी वर्गही  उपस्थित होता .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!