पोलीसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

32 लाख 51 हजार रु. किंमतीचे तेल भरलेले टँकर घेऊन निघाला , रस्त्यात आपघाताचा बनाव केला : २०.४१० टन तेलाचा केला आपहार !

परळी ग्रामीण पोलीसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
     लातूरहून 32 लाख 51 हजार रु.किंमतीचे तेल भरलेले टँकर घेऊन निघाला, परळी जवळील धर्मापुरी ते गुट्टेवाडी रस्त्यात आपघात झाल्याचे सांगितले. मात्र तसे काहीच घडले नाही तर सोयाबीन रिफाईन्ड तेलाची ने-आण करणाऱ्या एका टँकरचा आपघात झाला व तेल रस्त्यावर सांडून गेले असा बनाव या टँकरच्या चालकाने केला व स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी २४.९३० टन सोयाबीन रिफाईन्ड तेलापैकी तब्बल २०.४१० टन तेल विक्री करत आपहार केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, संजय ज्ञानोबाराव फुके वय-५२ वर्षे व्यवसाय-व्यापार रा घर नं ७९ गजानन कृपा निवास पंचमुखी हनुमान मंदिराच्या पुढे, गणेश नगर नांदेड जि नांदेड या व्यापाऱ्याकडील तेलाची ने-आण करणाऱ्या  टँकरवर राजेंद्र शिवाजी मुंडे रा. सेलमोहा ता- गंगाखेड जि परभणी  हा चालक काम करत होता. जितुंर येथीलमयुर प्रदिप कोकडवार यांच्या मयुर एजन्सीनेमास फुड प्रोडक्ट यांचेकडून तेलाची खरेदी ऑर्डर केली.हे तेल ए डी एम अँग्रो इंडस्ट्रीज लातुर यांच्याकडून टॅकरमध्ये भरणा करण्यात आले.हे टँकर घेऊन यातील आरोपी चालक लातूरहून जिंतूरकडे जात असतांना परळीजवळील धर्मापुरी ते गुट्टेवाडी या रस्त्यावर या टॅकरचा आपघात झाला आहे असा त्याने बनाव केला.टँकरमधून भरणा केलेले २४.९३० टन सोयाबीन रिफाईन्ड तेल किंमत रुपये ३२,५१,१२१/- यापैकी २०.४१० टन सोयाबीन रिफाईन्ड तेल रस्त्यावर सांडून गेल्याचाही बनाव केला.अपघाताच्या बनावामध्ये काही तेल जमिनीवर पसरुन नुकसानही केले.तब्बल २०.४१० टन सोयाबीन रिफाईन्ड तेल स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी विकून टाकले व आपहार केला.अशा आशयाच्या फिर्यादीवरुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या चालकाविरुद्ध गुरनं१५२/२०२५ कलम ३१८(४),३१६(२),३२४(४),  बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि केदार हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार