विद्यार्थ्यांसह पालकांचे प्रबोधन काळाची गरज - प्रा. टी.पी. मुंडे 


परळीत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थी प्रबोधन मेळावा उत्साहात 

परळी ,प्रतिनिधी    

 आजची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांसह पालकांचे प्रबोधन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे यांनी केले.ते क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परळी येथे आयोजित विद्यार्थी प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक रानबा गायकवाड होते, तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथराव गायकवाड, ज्येष्ठ नेते माधवराव ताटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम माने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, विचारवंत अजयकुमार गंडले, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सावंत, लेखक-दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे, माजी नगरसेवक महेंद्र रोडे, फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाचे समन्वयक भगवान साकसमुद्रे, मूफ्टा जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे, मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर आणि विचारवंत प्रा. दयानंद झिंझुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. 

   यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मिलिया विद्यालयातील विद्यार्थी सय्यद साद अब्दुल गनी याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा साकारल्याने तो कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. याप्रसंगी माधवराव ताटे, मिलिंद घाडगे ,उत्तम माने ,विश्वनाथराव गायकवाड, प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, अजयकुमार गंडले, प्रा. दयानंद झिंजुर्डे, भैय्यासाहेब आदोडे यांनी आपले विचार मांडले.

   या प्रबोधन मेळाव्यास पत्रकार धनंजय आरबुने, संपादक नितीन ढाकणे, सिद्धेश्वर इंगोले, लक्ष्मण वैराळ, वैजनाथ कळसकर, जितेंद्र मस्के, राजेश सरवदे, गौतम साळवे, संदीप ताटे, पिंटू डापकर, कवी मुख्तार पानगावकर, विलास ताटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान साकसमुद्रे यांनी केले, तर आनंद तुपसमुद्रे यांनी सूत्रसंचालन आणि श्रीकांत पाथरकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विठ्ठलराव झिलमेवाड, कवी बा. सो. कांबळे, पत्रकार विकास वाघमारे, नवनाथ दाणे, प्रा. ब्रम्हानंद कांबळे, विद्याधर शिरसाट, विनायक काळे, आकाश देवरे आणि सम्राट गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार