पत्रकार अनिल भंडारी यांना पितृशोक; मिलापचंद भंडारी यांचे निधन

बीड : शहरातील सारडा संकुल येथील रहिवासी सेवानिवृत्त कंडक्टर मिलापचंद पारसमल भंडारी यांचे बुधवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ३:२० वाजता संथारा व्रताने निधन झाले. दुपारी बारा वाजेदरम्यान त्यांना प्रत्याख्यान देण्यात आले होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ८३ वर्ष होते‌. त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाम स्मशानभूमीत  गुरुवारी दि.२४ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पक्षात दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे, चार भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. लोकमतचे उपसंपादक अनिल भंडारी, व्यापारी अभय भंडारी यांचे ते वडील होत.

-----

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !