एका शाळकरी विद्यार्थ्यासाठी एस.टी फिरली माघारी

कर्तव्यावर अशी ही माणुसकी-शिक्षणप्रेमींनी केले स्वागत


परळी / प्रतिनिधी....

   ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी हे एस.टी बस मधून शाळेला ये-जा करतात. एकीकडे जाणीवपूर्वक या शाळकरी विद्यार्थ्यांना पाहून एस. टी बस उभी करण्याचे टाळत असल्याचे प्रकार नित्याचेच असताना गुरुवारी एका शाळकरी मुलाला घेण्यासाठी परळी आगाराच्या वाहक आणि चालकांनी पुढे निघालेली एस.टी बस चक्क 200 मीटर पेक्षा अधिक अंतर रिव्हर्स घेत मुलाला एस.टी  बस मध्ये घेत त्याला शाळेच्या ठिकाणी पोहच केले. कर्तव्यावर असताना देखील आपल्यातील माणुसकी दाखवल्या बद्दल परळीतील पत्रकार अनुप कुसुमकर यांच्या प्रयत्नाने शिक्षणप्रेमी, एस.टी कामगार संघटना व विद्यार्थ्यांनी या वाहक-चालकाचा आगारात सत्कार करून अभिनंदन केले.

       नित्यनियमाने गुरुवार दि 17 रोजी परळी आगाराची आज MH-14 -BT-1716 हि एस.टी बस  परळी ते कवडगाव या दरम्यान प्रवास करत असताना. तळेगाव या ठिकाणाहून पुढे गेली याच वेळी तळेगाव येथील 11-12 वर्षाचा एक शाळकरी मुलगा पाठीवर दफ्तर, हातात टिफिन बॅग घरून बस पुढे गेली म्हणून परीक्षेला जाण्यासाठी बस मागे धावत सुटला. बस मागे विद्यार्थी धावत आहे हे चालकाच्या व वाहकाच्या लक्षात आल्यास बसचे चालक  रामदास गीते (बॅच नंबर 475 ) व वाहक संदिपान मुंडे ( क्रमांक 26910 ) यांनी एस.टी बस सुमारे 200 मीटर पेक्षा अधिक अंतर बस रिव्हर्स घेऊन त्या विद्यार्थ्याला आदराने बस मध्ये बसवले. सदरील प्रकार परळीतील पत्रकार मित्र अनुप कुसूमकर सर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत परळी आगार, एस.टी कामगार संघटना व शिक्षण प्रेमी यांना कल्पना देत या चालक आणि वाहक यांना रोख रक्कम व सत्काराचे नियोजन करत अभिनंदन करण्याचे नियोजन केले.

      एस.टी बस परळी आगारामध्ये सकाळी 10 वाजता वापस आली असता तितक्याच आदराने व सन्मानाने स्वागत केले. याप्रसंगी शिक्षण प्रेमी केशवराज मुंडे, एसटी संघटनेचे कार्यकर्ते रामकृष्ण कोरडे व एस.टी बसने प्रवास करणारे विद्यार्थी आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्याबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल चालक व वाहक यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार