नगरपरिषद कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  

          परळी शहरातील नगर परिषद कार्यालय येथे बुधवार दि. ३० एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान उपस्थित नगर परिषद कार्यालयातील मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला. 

              नगर परिषद कार्यालयात येथे महात्मा बसवेश्वर महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती मोठ्या हर्षोल्हासात व अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व जनमानसांत समतावादी विचार रुजवणारे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे व उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला.  

        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. पंढरपूरचा विठोबा हे ठाकूर तथा इंगळे घराण्याचे कुलदैवत त्यामुळे तुकडोजी महाराजांना लहानपणीच विठ्ठलभक्तीची आवड निर्माण झाली. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देशालाच देव मानणारे, माणसात देव शोधणारे, गरजूंना मदत करणारे संत अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात फक्त आणि फक्त देशाच्या विकासाचाच विचार केला. 

        महात्मा बसवेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील एक महान समाजसुधारक, संत आणि लिंगायत धर्माचे प्रवर्तक होते. त्यांचा जन्म कर्नाटकातील इंगळेश्वर-बागेवाडी येथे झाला. समाजाची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांनी लोकांना गरीब, गरजू आणि पीडितांना मदत करण्याचा आग्रह केला.  एक महान समाजसुधारक आणि धर्मगुरू होते. त्यांनी समाजाला एक नवीन दिशा दिली आणि त्यांच्या विचारांनी आजही लोकांना प्रेरणा मिळत आहे. अनेक कवी, लेखक आणि विचारवंतांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे साहित्य आणि कला क्षेत्रात प्रगती झाली. 

           यावेळी उपमुख्यधिकारी संतोष रोडे, प्रविण मोगरकर, शंकर साळवे, किरण उपाडे, सिद्धेश्वर घोंगडे, सुदाम नरवडे, मलिकार्जुन खाकरे, अश्विन मोगरकर, रमेश चोंडे, सुनील भगत, संदिप हजारे, सावजी, बांगर मॅडम, स्वामी मॅडम, शिंदे मॅडम, विक्रम स्वामी, पंकज दहातोंडे, लक्ष्मीकांत देशमुख, प्रफुल्ल साळवे, शहाणे, जावेद, प्रदीप नवाडे, सुशील जगतकर व कर्मचारी उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !